22 January 2025 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या | गृहमंत्र्यांचा खोचक टोला

Home minister Anil Deshmukh, MLC election result, BJP, MahaVikas Aghadi

पुणे, ४ डिसेंबर: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी (State Home Minister Anil Deshmukh) एका हिंदी सिनेमाच्या गाण्याच्या ओळी शेअर करत भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?…ये ना पुछो, विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या. महाविकासआघाडीला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी. ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत, असं देशमुख यांनी विरोधकांना सुनावलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात स्पष्ट कौल देणाऱ्या महाराष्ट्रापुढं आम्ही नतमस्तक आहोत. सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले; आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवले. कालही आम्ही जनतेपुढे विनम्र होतो, आजही आहोत आणि सदैव राहू, असंही त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालांमध्ये आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकट्याशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळं चित्र दिसणार नव्हतं. तरीही आम्ही निकराने लढलो. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकेकट्यानं लढावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही,’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या या पराभवाला तीन पक्षाची एकजूट कारणीभूत असल्याचं पाटील यांनी मान्य केलं आहे. पुण्यात मतं खाणारा तिसरा ताकदीचा उमेदवार नसल्यामुळं भारतीय जनता पक्षाला फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदानाचे दाखलेही दिले आहेत.

राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार होते.

 

News English Summary: Home Minister Anil Deshmukh has slammed the Bharatiya Janata Party (BJP) for sharing the lyrics of a Hindi movie song after the Mahavikas alliance emerged victorious in the Legislative Council’s graduate and teacher constituencies.

News English Title: State Home minister Anil Deshmukh reaction after MLC election result news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x