5 November 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

अशी सरकारं फार काळ टिकत नाहीत | जेव्हा कोसळेल तेव्हा पर्यायी सरकार देऊ - फडणवीस

Devendra Fadnavis, MahaVikas Aghadi government

मुंबई, ११ नोव्हेंबर: राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे दावे भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली ते गल्लीतील नेत्यांनी केले आहेत. मात्र बिहार मधील सत्ता एनडीएने कायम राखल्यानंतर भाजपच्या नेत्यांना पुन्हा स्वप्नं पडू लागली आहेत. पाच वर्षातील एक वर्ष सरकार पडण्याची वाट पाहिल्यानंतर उरलेल्या ४ वर्षांवर पुन्हा वक्तव्य येण्यास सुरुवात झाली आहे.

बिहारमधील विजयानंतर आता फडणवीस (Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी राज्यातल्या सत्तापरिवर्तनाबद्दल वेगळी भूमिका मांडली. ‘आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे लक्ष ठेवून काम करत नाही. राज्यातलं सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल. कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ,’ असं फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra State President Chandrakant Patil) यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार विषयी महत्त्वाचे विधान केले. ‘महाराष्ट्रातील सरकार चार वर्षे टिकणार नाही’, असा दावा त्यांनी केला. सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही. भाजप हा घटना मानणारा पक्ष आहे आणि घटनाविरोधी कोणतेही काम आमच्याकडून होणार नाही. यापुढेही राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत राहणार आहोत, असे पाटील म्हणाले.

 

News English Summary: Leaders of the Bharatiya Janata Party (BJP) from Delhi to the streets have claimed that the Maha Vikas Aghadi government in the state will collapse. However, after the NDA retained power in Bihar, BJP leaders have started dreaming again. After waiting for one year out of five years for the government to fall, statements have started coming again for the remaining four years.

News English Title: State opposition leader Devendra Fadnavis statement on MahaVikas Aghadi government news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x