16 April 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; राज्यात एकूण १२४ रुग्ण

Corona Crisis, Positive Cases

मुंबई, २६ मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात झालेला महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ४ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे आज पुन्हा दोन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असता हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या २ खासगी रुग्णालयात गेली होती अशीही माहिती समोर येत आहे.

राज्यातील कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातून दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्याचा आकडा १२४ वर गेला आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री बुधवारपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य सरकारनेही यापूर्वीच उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे.

 

News English Summery: The number of coronary patients and deaths is increasing in Maharashtra. The death of a woman at a private hospital in Vashi is believed to have been caused by Corona. As a result, the number of coronary deaths in Maharashtra has reached 4, according to the Health Department. On the other hand, the number of coronas patients has increased by double digits today. According to information received, the woman died on March 24. While the autopsy report was available today, it was revealed that the death was caused by coronas. It is also reported that the deceased woman has gone to 2 private hospitals in Vashi for treatment.

 

News English Title:  Story 2 new positive cases of Corona virus in Mumbai and thane total number of positive cases in the Maharashtra is 124 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या