15 November 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा ४१६'वर पोहोचला

Corona Crisis, Covid 19, Maharashtra Corona Crisis

मुंबई, २ एप्रिल: राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८१ नव्या करोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं करोना रुग्णांचा आकडा ४१६वर गेला आहे. एकट्या मुंबईत आज दिवसभरात ५७ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण रुग्णांची संख्याही ४०० पार झाली आहे. आज एकूण ८१ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ३३५ वरून थेट ४१६ वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये पुण्यात६, पिंपरी चिंचवडमध्ये ३, मुंबई ५७, नगर ९, ठाणे ५ आणि बुलढाण्यामध्ये १ रुग्ण सापडला आहे. तर गेल्या काही दिवसांत केवळ तीनच रुग्णांना डिस्चार् देण्यात आला आहे. राज्यात एकून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ४२ झाली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोविड-१९ रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांमध्ये २३०५ खाटा उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.

 

News English Summary: The number of coroners in the state is increasing rapidly. There are 81 new coronary patients in the state today. Because of this, the number of Corona patients has risen to six. In Mumbai alone, 57 patients have been diagnosed with coronary infection throughout the day. So far 19 people have died. So far 19 people have died due to corona in Maharashtra and the total number of patients has crossed 400. Today, the number has increased from 335 to 416, with a total of 81 new patients found. In Pune, 6 patients were found in Pune, 3 in Pimpri Chinchwad, 57 in Mumbai, 9 in Thane and 5 in Buldhana. In the last few days, only three patients have been discharged. The number of home-cured patients has increased to 42 in the state.

 

News English Title: Story 81 New corona positive cases reported in Maharashtra total number positive cases in the state rises to 416 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x