कोरोना संशयितांची नावं जाहीर करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
नगर, १९ मार्च: मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा फैलाव वाढतच असून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, लागण होण्याच्या भीतीनं काही ठिकाणी करोनाच्या ग्रस्तांना व संशयितांना बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याच्या घटना पुढं आल्या आहेत. त्यामुळं खबरदारी म्हणून करोनाच्या रुग्णांची नावं जाहीर न करण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. मात्र, मनसेनं त्यास आक्षेप घेतला होता.
दरम्यान, करोनाग्रस्त रुग्णांची नाव उघड करु नयेत असे प्रशासनाचे आदेश असताना हे आदेश धाब्यावर बसवून रुग्णांची नाव उघड केल्याचा प्रकार राज्यात समोर आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उपाध्यक्ष संजीव पाखरे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार पाखरे यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका पाखरेंवर ठेवण्यात आला आहे. पाखरे हे राज ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केलेल्या मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलचा कर्मचारी कैलास काशिनाथ शिंदे याने या संदर्भात फिर्याद दिली आहे. करोनाचे संशयित रुग्ण म्हणून तिघांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. हे तिघे हॉस्पिटलमधून निघून गेले होते. त्यांचा शोध घेण्याबाबातचे पत्र सिव्हिल प्रशासनाने रुग्णांच्या नावासह दिले होते. त्याचवेळी तिघेही परत सिव्हिलमध्ये दाखल झाले होते. परंतु त्यांच्या नावाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करून तिघांची नावे उघड करण्यात आली होती.
News English Summery: With Mumbai, the prevalence of coronary disease is increasing in Maharashtra and the number of patients in Maharashtra has reached 47. Various measures are being taken by the state government to deal with the crisis. However, in some places fear of contagion has led to reports of krona sufferers and suspects facing deportation. As a precaution, the government has taken the role of not releasing the names of coronary patients. However, MNS had objected to it. Meanwhile, while the administration has ordered that the names of the coronary patients should not be disclosed, it has come to the state that the order has been disclosed by placing these orders on the skin. A case has been registered against Maharashtra Navnirman Sena (MNS) vice-president Sanjiv Pakhare for violating the orders of the Collector. Accordingly, a criminal case was registered against Pakhre under the Emergency Management Act on Wednesday night. The District Collector and the President have been accused of violating the order issued by the district emergency management. Pakhare is in the recently announced MNS shadow cabinet by Raj Thackeray.
News English Summery: Story Ahmednagar MNS leader Sanjeev Pakhare booked for disclosing names of corona suspects.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO