15 November 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

राज्यातील १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

Corona Crisis, Covid 19, Farmers Loan

मुंबई, ०१ एप्रिल: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशातच संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्याला सरकारकडून दिलासा मिळाला आहे. राज्यातील जवळपास १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात ट्विट करत ही माहिती दिली.

कोरोना आपत्तीपूर्वी अजित पवार यांनी ११ हजार ४६८ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. १५ मार्च रोजी अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली होती की, “महात्मा ज्योतिबा फुले शेतकरीfarmers कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. १३ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे”.

त्यानंतर राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख, तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत असंही अजित पवार यांनी सांगितले आहे.

 

News English Summary: Government is working hard to prevent the spread of the corona virus. Similarly, the farmers in the troubled state have received comfort from the government. According to Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar, loan waiver amount has been deposited in the accounts of around 9 lakh farmers in the state. Ajit Pawar tweeted this on Wednesday in a tweet about farmers’ loan waiver.

 

News English Title: Story Ajit Pawar says debt waiver amount deposited in the accounts of 19 Lakh farmers News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x