15 November 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, CM ठाकरेंची केंद्राकडे मागणी

Covid 19, Corona Crisis, Lockdown, CM Uddhav Thackeray

मुंबई, २१ एप्रिल: एकट्या मुंबईत ३४५१ कोरोनाबाधित असून १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपात १५० कोरोनाबाधित असून ४ जण दगावले आहेत. तर ठाण्यात २२ जण बाधित असून २ जण दगावले आहेत. नवी मुंबईत ९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण-डोंबिवली मनपात ९३ जण कोरोनाग्रस्त आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर उल्हासनगरमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

लॉकडाउनमुळे परराज्यातले जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवारा केंद्रातून उत्तम व्यवस्था केली जाते आहे. साधारणतः सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांच्या जेवणाची व्यवस्था आणि इतर व्यवस्था केली आहे. त्यांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तरीही हे लोक घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पावित्र्यात येतात. ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन परराज्यातील अडकलेल्या या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्राकडे केली आहे.

अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. परराज्याप्रमाणेच राज्यातील नागरिकही जिल्ह्याजिल्ह्यांत अडकले आहेत. त्यांच्यासाठीही हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले. परराज्यातील नागरिक घरी जाताना सुरुवातीपासून शेवटापर्यंत म्हणजे त्यांच्या घरापर्यंत त्यांचे निरिक्षण करता येईल, त्यांना तिथे क्वारंटाइन करता येईल व विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेता येईल, अशी व्यवस्था करून त्यांना पाठवता येईल का, याचा विचार करून केंद्र सरकारने वेळेत निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has once again demanded that a special train be arranged to send the stranded workers back to their hometowns if the Union government predicts an increase in the incidence of the virus from April 30 to May 15.

News English Title: Story arrange special train for labours in other states who stuck in Maharashtra because of lockdown demands Chief Minister Uddhav Thackeray to Modi government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x