15 January 2025 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

औरंगाबाद महापालिका निवडणुकीपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Kannad Former MLA Harshavardhan Jadhav, atrocity FIR registered

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं होतं.

त्यावेळी हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासह शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुहास दशरथे यांनी देखील मनसेत प्रवेश केला होता. मनसेने भगव्या हिंदुत्वाचा राजकीय मार्ग स्वीकारल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेतील नेत्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यात मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यात २-३ महिन्यावर आलेल्या औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनसे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढणार असल्याने स्थानिक पातळीवर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता, ते शिवसेनेचे नांदेडमधील प्रमुख पदाधिकारी होते.

मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना तब्बल ३ लाखाच्या आसपास मतं मिळाली होती आणि मराठा समाज त्यांच्या केंद्रस्थानी होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करणाऱ्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यानंतर आता औरंगाबादमधील राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला.

 

News English Summery: Bharatiya Janata Party’s senior leader and Union Minister of State for Ravsaheb Danve, son-in-law and former Shiv Sena MLA Harshavardhan Jadhav, had re-entered the Maharashtra Navnirman Sena a few days back. While saying that the party will be working in Marathwada after the party entry, Jadhav fired a gun on Shiv Sena leader Chandrakant Khaire. He also predicted that Chandrakant Khair would never be an MP again in his life.

 

Web News Title: Story atrocity FIR registered against kannad Former MLA Harshavardhan Jadhav.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x