19 January 2025 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Monthly Income | होय खरं आहे, PPF बचतीतून मिळेल 41 लाखांचा परतावा, दरमहा कमवा 24,000 रुपये Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे MSSC Scheme | तुमची पत्नी व्याजाने मिळवून देईल 32,000 रुपये, गुंतवा केवळ 2 लाख रुपये, फायद्याची योजना जाणून घ्या Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या SBI म्युच्युअल फंडात, पैसे 4 पटीने वाढतील, संधी सोडू नका EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
x

औरंगाबाद: ३१ कोरोना रुग्णांपैकी १४ रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी

Covid 19, Corona Crisis, Aurangabad

मुंबई, २० एप्रिल: राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ४८३ वर पोहोचली आहे. ही सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामध्ये भिवंडी १,कल्याण डोंबिवली १६, मीरा भाईंदर ७, बृहन्मुंबई १८७, नागपूर १, नवी मुंबई ९, पनवेल ६, पिंपरी चिंचवड ९, रायगड २, सातारा १, सोलापूर १, ठाणे २१, वसई विरार २२ अशी २८३ नवीन रुग्णांची वाढ झाली असल्याचं राजेश टोपे यांनी नमूद केलं.

दरम्यान, औरंगाबादमध्ये ‘कोविड १९’ चा संसर्ग झालेल्या रुग्णांचा तेराव्या दिवशीचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने करोनामुक्त झालेल्या सहा जणांना आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले, अशी माहिती घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. जिल्ह्यात आजपर्यंत ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. काल पाचजण करोनामुक्त होऊन घरी परतले, त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाल्याने ३१ पैकी एकूण १४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तीन जणांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे देशामध्ये लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाता वेग कमी झाला आहे. लॉकडाऊनपूर्वी ३.४ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. मात्र आता यासाठी ७.५ दिवस लागत आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 

News English Summary: The number of coronary infected patients in the state has reached 4 thousand 483. The data is available till 11 am, Health Minister Rajesh Tope said. 283 new patients including Bhiwandi 1, Kalyan Dombivali 16, Meera Bhainder 7, Brihanmumbai 187, Nagpur 1, Navi Mumbai 9, Panvel 6, Pimpri Chinchwad 9, Raigad 2, Satara 1, Solapur 1, Thane 21, Vasai Virar 22. Rajesh Tope mentioned.

News English Title: Story Aurangabad 6 people wins war against Corona virus discharged from hospital Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x