छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमचं नगरसेवक पद रद्द
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर आणि अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला सरकारने मोठा दणका दिला आहे. सरकारकडून श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी छिंदमवर कारवाई करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर गुरुवारी सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र छिंदम या सुनावणीला उपस्थित राहिला नाही. त्यानंतर आजच्या सुनावणीलाही छिंदम अनुपस्थित होता. अखेर आज छिंदमला मुदतवाढ न देता किंवा त्यांची वाट न पाहता नगरविकास विभागाने आपला निकाल सुनावला.
अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर आणि भाजपच्या तिकीटावर त्यावेळी नगरसेवकपदी निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी श्रीपाद छिंदम गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तसबीरीला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला होता.
News English Summery: Chhindam came into the limelight after an audio clip of Chhatrapati Shivaji Maharaj’s offensive statement went viral on social media during a phone conversation in February 7. In this clip Chhindam was talking to the contractor in warm language while he was Deputy Mayor of Nagar. He also slandered Chhatrapati Shivaji Maharaj. This led to a wave of criticism against the BJP. After that, the BJP showed him a way out of the party. In this case he had to lose his councilor position. Former BJP deputy mayor and independent corporator Shripad Chhindam has given a big blow to contempt of Chhatrapati Shivaji Maharaj. Shripad Chhindam has been canceled by the government. Action has been taken against him for using abusive words about legends.
Web News Title: Story BJP Corporator from Nagar Shripad Chhindams councilor post canceled by Mahavikas aghadi government.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON