26 December 2024 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

९ फेब्रुवारीला जातीचा दाखल हरवला; वकील १५ फेब्रुवारीला सांगतात दाखला उच्च न्यायालयात?

BJP MP Jai Siddheshwar Maharaj, caste certificate

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी याचे जात प्रमाणपत्र सोलापूरातील जात पडताळणी समितीने रद्द केले. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. खासदारकी वाचवण्यसाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. याच दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला हरवला आहे. याप्रकरणी त्यांनी वळसंग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

९ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जातीचा दाखला हरवल्याचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. १४ फेब्रुवारी रोजी त्यांनीच ही तक्रार दाखल केली होती. १५ फेब्रुवारी रोजी जयसिद्धेश्वर महास्वामींच्या जात प्रमाणपत्राबाबत जातपडताळणी समिती समोर अंतिम सुनावणी ठेवण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांच्या वकिलांनी जातीचा दाखला उच्च न्यायालयात असल्याची माहिती दिली होती. सुनावणीच्या आदल्यादिवशीच त्यांनी जातीचा दाखला हरवल्याची तक्रार दिल्याने जातीचा दाखला नेमका आहे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, खासदारकी धोक्यात आल्याने खासदार जयसिद्धेश्वर यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे स्पष्ट करून रद्द केला होता. पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात त्यांनी ही तातडीची याचिका दाखल केली आहे. तर याप्रकरणी मूळ तक्रारदाराने कोर्टात धाव घेतली असून आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय या प्रकरणी स्थगिती देऊ नये, अशी विनंती कोर्टाला केली आहे.

 

News English Summery: BJP MP from Solapur Lok Sabha constituency Jaisideshwar Shivacharya Mahaswami’s caste certificate was revoked by the caste verification committee in Solapur. Therefore, their MPs are in danger. Efforts are underway to save him. Meanwhile, information has emerged that Jaisideshwar Mahaswami’s caste certificate has been lost. He has lodged a complaint with the Valasang police station. Jayasiddhashwar Mahaswamy in the complaint said that caste certificate was lost during the journey of Akalkot-Solapur on February 9 at the Valasang police station. He had filed the complaint on February 14. On February 15, a final hearing was held before Jaisideshwar Mahaswamy’s caste certification committee. But at that time, his lawyers had informed that the caste proof was in the high court. On the day before the hearing, they complained that the caste certificate was missing, but where the caste certification is, the question is being raised.

 

Web Title: Story BJP MP Jai Siddheshwar Maharaj caste certificate lost during traveling lodged police complaints.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x