22 January 2025 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

भाजपचा खडसे, तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळेंना नकार, इतरांना संधी

Ekanath Khadse, Pankaja Munde, Vionod Tawde

मुंबई, ८ मे: भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रवीण दटके (नागपूर), गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील आणि नांदेडचे अजित गोपछडे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे भाजपला विधानपरिषदेत प्रस्थापितांऐवजी नवे चेहरे पाठवण्यात अधिक रस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजप नेतृत्त्वाने चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली होती. तर पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात पराभव झाला होता. त्यामुळे हे सर्व नेते पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. एकनाथ खडसे यांनी अलीकडे राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. तर काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे भाजपकडून या नेत्यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल, असा अंदाज होता.

दरम्यान, सध्याच्या समीकरणांनुसार शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, काँग्रेसचा एक असे मिळून महाविकास आघाडीचे ५ आणि भाजपाचे तीन आमदार थेट निवडून येऊ शकतात. मात्र नवव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. भाजपानं चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं आता चूरस निर्माण होणार आहे. तर आता काँग्रेसनेही दुसरा उमेदवार विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

 

News English Summary: On behalf of the Bharatiya Janata Party, former MP Ranjit Singh Mohite Patil, Dhangar Samaj leader Gopichand Padalkar, former mayor of Nagpur Praveen Datke and Dr. Nanded. Ajit Gopchhade has been nominated for the Legislative Council. Therefore, the discussion on prolonging the political rehabilitation of former ministers Eknath Khadse, Pankaja Munde, Vinod Tawde and Chandrasekhar Bavankule has now started in the political circles.

News English Title: Story BJP will not give chance to senior leaders Eknath Khadse and Pankaja Munde for legislative council election News Latest updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x