21 April 2025 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

महत्वाचा निर्णय; कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी ३ प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं

CM Uddhav Thackeray, Covid19, Corona Crisis

मुंबई, ०८ एप्रिल: राज्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. हा काळ गुणाकाराचा आहे. चिंतेचे कारण आहे पण घाबरु जाऊ नका. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी घरी बसणं हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण लवकरच या परिस्थितून बाहेर पडू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी करण्यात आली आहे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावे. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडया जास्त प्रमाणात करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये करोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल. हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचा धोका मोठा आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा या आव्हानाचा मोठ्या हिमतीनं सामना करत आहे. मात्र आव्हानाची तीव्रता पाहता राज्यातील प्रशिक्षित नर्सेच, वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी तसंच लष्करातून निवृत्त झालेल्या आणि वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेल्या जवानांनी पुढे यावं. आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे, अशी साद मुख्यमंत्र्यांनी घातली. कोरोनाविरोधात आपण लढाई लढत आहोत. या लढाईमध्ये अनेकांची साथ लागणार आहे. आपल्या राज्यात जे प्रशिक्षित नर्स, रुग्णालय कर्मचारी आहेत, त्यांच्यापैकी जे कुणी सेवेत नसतील. त्यांनी या लढाईत लढण्याची मानसिक इच्छा असेल तर पुढे यावं. तसेच लष्करातील निवृत्त जवान ज्यांना वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे त्यांनी सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशा प्रकारच्या सेवेत यायची ज्यांची इच्छा असेल त्यांनी [email protected] या संकेतस्थळावर अर्ज पाठवावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

तसेच ‘केंद्रांची योजना अन्नसुरक्षा लाभार्थ्यांसाठीच आहे. सर्वांची सामुहिक जबाबदारी, केंद्र आणि राज्य दोघेही काम करत आहेत. साडेपाच ते सहा लाख लोकांना सरकार रोज जेवण पुरवत आहे. केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य देणार,’ अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 

News English Summary: The number of corona patients victims is increasing in the state. This is a time of multiplication. Worry, but don’t be afraid. But now we have to bring the increased numbers of corona patients to zero, “Chief Minister Uddhav Thackeray said. The only way they can overcome Corona is when the Chief Minister interacts with the public through Facebook Live on Wednesday. The Chief Minister expressed confidence that we would soon get out of this situation with the cooperation of all.

News English Title: Story Chief Minister Uddhav Thackeray says the increased number of corona patient has to be brought to zero Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या