...आणि राज आहे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपत्तीत सर्व एकत्र असल्याचा संदेश दिला

मुंबई, १५ एप्रिल: राज्यातलं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल पुन्हा जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं.
आपल्या सगळ्यांच्या एकजुटीनेच आपण नक्की जिंकणार आहोत हा आत्मविश्वास मला आहे. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात काहीही विचित्र सुरु नाही हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतं आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधन करत असताना सर्वपक्षीय नेते आपल्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. ‘राज आहे…पवार साहेब आहेत..सोनिया गांधी…अमित शहा हे सगळेच या लढाईत आपल्यासोबत आहेत,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. राज आणि उद्धव या दोन बंधूंमधील राजकीय संघर्षाची चर्चा नेहमीच होते. मात्र आता कोरोनाच्या संकटकाळात हे दोघेही मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. कारण याआधीही कोरोनाच्या आव्हानाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी राज मला दिलासा आणि सूचना हे दोन्ही देत असल्याचं म्हटलं होतं.
महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही काळजी करू नका. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. कोरोनाच्या लढ्यात पैसे इथून काढा, तिथून काढा असे सूचवत आहेत. पैसे कुठून आणि कसे काढायचे ते आम्हाला कुणी सांगू नये असा टोलाही त्यांनी लगावला. दररोज ६ ते ७ लाख मजुरांना दररोज नाश्ता आणि जेवण देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
News English Summary: The Chief Minister had announced two days ago that the lockdown in the state would be extended till April 30. Against that backdrop, he had interacted with the public again yesterday. At that time, he said, the fight against Corona should be taken seriously. Thanks to the Prime Minister for raising the lockdown. I had demanded that from the Prime Minister. Testing is taking place in Maharashtra. So our numbers are also increasing. “We are dealing with it very seriously and will continue to do so,” he said.
News English Title: Story Chief Minister Uddhav Thackeray statement on MNS Chief Raj Thackeray and other political leaders Covid19 Corona Crisis News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल