23 February 2025 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

सर्व राज्यातील रुग्णांचा टेस्टिंग व औषधांचा खर्च केंद्राने उचलावा - मंत्री जितेंद्र आव्हाड

Minister Jitendra Awhad, Corona Crisis

मुंबई, २४ मार्च: राज्यात मंगळवारी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील ३ तर साताऱ्यात १ नवा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्याने शतक पूर्ण केले आहे. या नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ वर गेला आहे. कोरोनाग्रस्तांचा वाढत असलेला आकडा पाहता महाराष्ट्रासमोरील चिंतेत भर पडत असल्याचे दिसत आहे.

राज्यात सोमवारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९७ इतकी होती. त्यात मुंबई ३८, पुणे २८, नवी मुंबई ५, सांगली, नागपूर, यवतमाळ, कल्याण प्रत्येकी ४, नगर, ठाणे प्रत्येकी २, पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, सातारा प्रत्येकी १ अशी संख्या होती. त्यात आता पुण्यामध्ये आणखी ३ आणि साताऱ्यात एका रुग्णाची भर पडली. अशा रितीने हा आकडा १०१ असा झाला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील प्रभाव वाढत चालला असून कोरोनाबाधितांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. अशातच मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला ६५ वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनासाठी त्रास होत असल्याने २३ मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, COVID १९ ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे. संबंधित चाचण्या महाग असून त्यासाठीचा तब्बल ४५०० रुपये खर्च सामान्यांसाठी महागडा असल्याने लोकं आजार देखील लपवू शकतात आणि त्यामुळे देखील अधिक नुकसान होईल. त्यामुळे केंद्राने सर्व राज्यांमधील रुग्णांच्या चाचणीचा आणि औषधांचा खर्च उचलावा अशी विनंती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 

News English Summery:  The impact of corona virus in Maharashtra is increasing and the number of coronary arteries has reached 101. Similarly, another coronary patient has died in Mumbai. The 65-year-old man who died of coronas had just arrived in Mumbai from the UAE. The man was admitted to Kasturba Gandhi Hospital in Mumbai on March 23 due to fever, cough and shortness of breath. Meanwhile, COVID 19 is a national disaster. Relevant tests are expensive and costing around Rs 4500 is expensive for luggage, so people can hide their illness and it will also cause more damage. Therefore, Minister Jitendra Awhad has requested the Center to raise the cost of testing and medicines for patients in all states.

 

News English Title: Story Corona affected patients expenses should done by central government said Minister Jitendra Awhad News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x