19 January 2025 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या SBI म्युच्युअल फंडात, पैसे 4 पटीने वाढतील, संधी सोडू नका EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा New Tax Slab | वार्षिक पगार 15 लाख तरीही जुनी टैक्स प्रणाली सर्वोत्तम, नवीन टॅक्स स्लॅब कोणासाठी फायदेशीर जाणून घ्या IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025
x

सरकारच्या आवाहनानंतर मनसेकडून सोशल डिस्टन्स राखत मोठं रक्तदान शिबीर

Corona Crisis, Blood Donation, MNS Avinash Jadhav, Covid 19

ठाणे, २८ मार्च: ‘राज्यात सध्या सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. त्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. फक्त रक्तदान करताना गर्दी करु नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन देखील त्यांनी केले होते.

‘करोना’च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील रक्तसाठ्याची वस्तुस्थिती देखील सांगितली होती. ‘राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्याच्या ब्लड बँकेचे प्रमुख थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार आसोशल पल्याकडं केवळ सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. रक्त दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. रक्ताचं आयुष्य फक्त ३५ दिवसांचं असतं. केवळ ‘करोना’च्या रुग्णांसाठी नव्हे, तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये गरजेचं असतं. थॅलेसिमिया, हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. रक्ताची जागा इतर कुठलंही औषध घेऊ शकत नाही. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं,’ असं आवाहन टोपे यांनी केलं होतं.

सरकारच्या आवाहनाला आवाहनाला प्रतिसाद देत आणि काळाची गरज ओळखून ठाण्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. मनसे कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद दिला आणि सरकारच्या नियमांचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळत संपूर्ण शिबीर पार पडलं. सदर रक्तदान शिबीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं होतं. त्यामुळे प्रशासन आणि सामान्य लोकं एकत्र येऊन कठीण काळाचा सामना करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: In the wake of the Corona crisis (Covid 19) , Rajesh Tope had communicated with the public through Facebook Live. At that time, he had also informed about the fact of blood in the state. ‘There is a blood shortage in the state. According to Thorat, the head of the state’s blood bank, only seven to eight days worth of blood transfusion is left over. Blood cannot be stored for long. The life span of the blood is only 35 days. Not just for “coronary” patients but many medical treatments are needed. Blood is needed for patients with thalassemia, hemophilia. No other drug can replace blood. That is why blood donors should come forward, ‘appealed Health Minister Rajesh Tope.

News English Title: Story Corona crisis after state government request for blood donation MNS Thane organised huge blood camp with social distance News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x