15 January 2025 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

मुख्यमंत्र्यांकडून इस्पितळांबाबत संवाद; तर मोदी थाळी-टाळी आणि आता दिवा-बत्ती

Corona Crisis, Covid 19, CM Uddhav Thackeray, PM Narendra Modi

नवी दिल्ली, ३ एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली त्यावेळी त्यांनी २९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता लोकांना थाळी, टाळी आणि घंटानाद करुन आरोग्य कर्मचारी जे कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन केलं होतं तेव्हा मोदींच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्यावेळी काही लोकांनी घराबाहेर पडून, रस्त्यावर एकत्र जमून थाळीनाद, रॅली काढून सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांना हरताळ फासला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे लॉकडाऊन उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता याबाबत खबरदारी घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता रविवारी पुन्हा दिवा-बत्ती आणि मोबाईल फ्लॅशचा मार्केटिंग कार्यक्रम आखला आहे.

देशाच्या पंतप्रधानांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरून जमिनीवरील उपाय योजना करणं अपेक्षित असताना लॉकडाउनमध्ये नकोत उद्योग सुरु केल्याचं पाहायला मिळतं. संवादादरम्यान त्यांच्या भाषणातील शब्दांमध्ये गांभीर्य दिसत असलं तरी प्रत्यक्ष कृतीत मात्र त्यांनी सर्व जवाबदारी त्या-त्या राज्यांवर टाकून केवळ डिजिटल संवाद मेळावे भरवल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या विषय निवळल्यावर सर्व देशातील मुख्यमंत्र्यांचं क्रेडिट मोदींनी घेतल्यास नवल वाटायला नको. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउनमध्ये घरी बसलेल्या लोकांना स्वतःभोवती खिळवून ठेवण्याची संधी ते निश्चित घालण्यावर नाहीत. त्यासाठी हे कोरोना आपत्ती देखील संधीत बदलण्याचे प्रकार सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ते देखील समाज माध्यमांच्या मार्फत जनतेशी संवाद साधत आहेत, मात्र जमिनीवरील आरोग्यविषयक सुविधांवर देखील तितकंच लक्ष ठेवून काम करत आहेत आणि काल जाहीर झालेली ३० इस्पितळांची यादी त्याचाच भाग आहे. राज्यात मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि सर्व सनदी अधिकारी एकत्र कामाला लागलेले असताना दुसऱ्या बाजूला, दिल्लीत मात्र केंद्राने ९० टक्के जवाबदारी सचिवांवर ढकलून दिल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार संबंधित समाज माध्यमांचा आढावा घेतल्यास देखील वास्तवाचं गांभीर्य कुठे आहे त्याचा प्रत्यय येईल.

दरम्यान, कोरोना विषाणू येत्या काळात पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही. तसे कोणतेही पुरावे नाहीत. लोकांना हा विषाणू आहे हे गृहीत धरूनच आपले काम करावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळातही कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा शोध घेणे, त्यांना विलग करणे, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, त्यांना अलगीकरणात पाठवणे हीच साखळी कायम ठेवावी लागेल, असे स्पष्ट मत जागतिक आरोग्य संघटनेचे कोविड १९ प्रतिबंधक विशेष दूत डॉ. डेव्हिड नबारो यांनी म्हटले आहे.

 

News English Summary:  It is seen that the country’s prime minister initiated a lock down when the Prime Minister of the country was expected to undertake land remediation plans on health infrastructure. Even though the words of his speech appear to be serious during the dialogue, in actual practice, he is seen to have put all the responsibility on those states, and only fill digital communication meetings. If Modi issues the credit of the chief ministers of all the countries when the issues are resolved tomorrow, don’t be surprised. So they are not going to miss the chance to hang around with people at home throughout the lock down. For this, it is discussed that the Corona disaster is about to change.

 

News English Title: Story Corona crisis CM Uddhav Thackeray and state government is working on health infrastructure and Modi on marketing.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x