15 November 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
x

सौदीहून परतलेल्या सांगलीतील ४ जणांना कोरोनाची बाधा; रुग्णांचा आकडा वाढला

Corona Crisis, Maharashtra Sangali

मुंबई, २३ मार्च: करोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढतो आहे. भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही ४१८ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ८९ वर पोहचली आहे. देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ८९ रुग्ण आहेत. हाच धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात आजपासून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

दुसरीकडे सांगलीत कोरोनाचे ४ रुग्ण आढळले आहेत आणि सौदीहून परतलेल्या चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे सरकारची धाकधूक वाढली असून कोरोनाची लागण ग्रामीण महाराष्ट्राकडे देखील पसरू लागल्याने प्रशासनाची मोठी कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९वर पोहोचली असून, त्यांच्यावर सध्या कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहे. तर राज्यात कोरोनानं आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यानं कलम १४४ लागू केलं असून, मुंबईतली लोकल सेवा, लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या बंद केलेल्या आहेत. तसेच लोकांना ३१ मार्चपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

 

News English Summery:  The outbreak of Corona is increasing in India. This is a matter of concern for India and Maharashtra. Because the number of coronary patients in India has reached 418. In Maharashtra, the number has reached 89. Of all the states in the country, Maharashtra has the highest number of 89 patients. In view of this danger, a ban has been implemented in Maharashtra since today. On the other hand, four coronary patients have been found in Sangli and four returning from Saudi are reported to have had Corona obstruction. As a result, the government has increased its fears and the coronary infection is spreading to rural Maharashtra as well.

 

News English Title:  Story Corona crisis in Maharashtra 4 more positive cases found in Sangali News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x