22 February 2025 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

कोरोना व्यतिरिक्तही अनेक आजार आहेत याचा डॉक्टरांना विसर..घाबरून स्थानिक क्लीनिक्स बंद

Rajesh Tope, Corona Crisis, Doctors Clinics

मुंबई, २७ मार्च:  कोरोनामुळे देशभरात भीतीचं वातावरण असताना या आजाराला घाबरून आपल्या क्लिनिकवर गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक डॉक्टर्स त्यांचे दवाखाने बंद ठेवून आहेत. मात्र त्यामुळे इतर रोजचे आजार आणि त्यांच्या निदानासाठी जायचं तरी कुठे असा प्रश्न सामन्यांना पडला आहे. राज्यातील करोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून आज त्यात पाच जणांची भर पडली आहे. करोना रुग्णांचा आकडा आता १३५ झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तसंच, खासगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिक सुरू ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यातील डॉक्टरांनी भितीपोटी दवाखाने बंद ठेवणे हे चूकीचे आहे. डॉक्टरांकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं त्यांना देव मानलं जातं. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद न ठेवता रुग्णांवर उपचार करावे, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. या महासंकाटाच्या काळात कोणीही असंवेदनशीलता दाखवू नका, असे त्यांनी सर्वांना सांगितलं आहे.

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. करोनामुळं निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. ‘आतापर्यंत ४२२८ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ४०१७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. आता ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या ‘तीन टी’वर भर देण्यात आला आहे. १९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. डिस्चार्जचा हा आकडा हळूहळू वाढत जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्कचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. पीपीई आणि एन -९५ मास्क दिले जात आहेत. पण कोरोना रुग्ण किंवा संशयितांना उपचार करताना डॉक्टरांनी त्याचा आग्रह टाळावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसंच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

News English Summary: Local doctors are shutting down their clinics so as not to scare the clinic with fear of coronary disease in the country due to fear of Corona. However, so many others have to go for their daily ailments and their diagnosis, but the question is where. The number of coronary patients in the state is increasing day by day and today it has increased by five. The number of Corona patients has now increased to 135, state health minister Rajesh Tope said today. He also suggested that private doctors continue their clinics. It is wrong for doctors in the state to close the hospital in fear. Doctors are seen as ideal, they are considered as God. Therefore, the state health minister Rajesh Tope has requested that doctors should treat patients without shutting down hospitals. He told everyone not to be insensitive during this crisis.

 

News English Title: Story Corona Crisis many local doctors kept clinics closed health minister Rajesh Tope angry News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x