जिल्हा नियोजन निधीतून ५० लाख उपलब्ध; आ. राजू पाटील कल्याण-डोंबिवलीसाठी तत्पर
डोंबिवली, २ एप्रिल : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन अधिकारी (ठाणे) यांच्याकडे केली होती. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असताना कल्याण डोंबिवली परिसरात रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांचा समावेश असून अश्या विविध स्थानिक स्वराज्य संस्था मिळून तयार झालेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात कोरोनावर मात करण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य पुरवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे केडीएमसी क्षेत्रासाठी २५ लाख, ठाणे महापालिका क्षेत्रासाठी १५ लाख आणि १४ गावांसाठी १० लाख असे सुमारे ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सध्या कल्याण ग्रामीण विधानसभेच्या क्षेत्रात मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वतः लक्ष घालून विविध उपयोजना सुरू केल्या आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये फवारणीचे काम चालू झाले आहे आणि काही ठिकाणी धान्यवाटप पण चालू केले आहे.आमदारांसोबत मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आपल्यापरीने मदतकार्य आणि समाजसेवा करत आहेत.
दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५ नविन रूग्ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्णसंख्या आता १९ वर पोहोचली आहे. नवीन रूग्णांपैकी ४ रूग्ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून ०१ रूग्ण कल्याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील ०३ रुग्ण हे लग्न सोहळयाशी संबंधीत असून ०१ रूग्ण कोरोनाबाधित रूग्णाचा सहवासित आहे. नवीन रूग्णांपैकी कल्याण पुर्व येथील रूग्ण हा एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्ण कस्तुरबा रूग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.
News English Summary: The outbreak of corona virus is increasing rapidly in the Kalyan Dombivali Municipal Corporation area of Kalyan Rural Assembly. The District Planning Officer (Thane) had demanded immediate approval of the Rs. The corona virus is infected. While Maharashtra has the highest number of coronary patients, the number of patients in Kalyan Dombivali area is increasing. Therefore, MNS MLA Raju Patil had demanded immediate funding for medical equipment and materials to prevent the outbreak of the corona virus.
News English Title: Story Corona Crisis MNS MLA Raju Patil managing fund for fight against Covid 19 for Dombivli Kalyan Cities News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO