15 January 2025 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

केडीएमसी हद्दीत कोरोना टेस्टींग लॅब आवश्यक; आ. राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

MNS MLA Raju Patil, Corona Crisis, Covid 19 test lab, CM Uddhav Thackeray

कल्याण-डोंबिवली, २९ मार्च: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील १४ रुग्ण, पुण्यातील १५, नागपूरमधील १, औरंगाबाद १, यवतमाळमधील ३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९६ वर गेली आहे.

काही दिवसांपूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशातील एकूण १६ खासगी लॅबना कोरोना विषाणू शोध चाचणी सुरू करण्याला मंजुरी दिली होती. यामध्ये दिल्लीतील डॉ. लाल पॅथलॅब्स, डॉ. डॅंग लॅब, इंद्रप्रस्थ अपोलो यांचा समावेश आहे. आयसीएमआरने रविवारी सहा तर सोमवारी दहा पॅथॅलॉजी लॅब्सना कोरोना विषाणू शोध चाचणी सुरू करण्याला मंजुरी दिली होती.

तत्पूर्वी मुंबई महानगर पालिका कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. या सुविधेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या संशयिताच्या तपासणीचे नमुने घरी जाऊन घेतले जातील असं स्पष्ट केलं होतं. हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करुन कोरोनाच्या चाचणीसंदर्भात बुकींग केल्यानंतर खासगी लॅबचा प्रतिनिधी घरी येऊन नमुने घेऊन जाईल, अशी सेवा पुरवण्यात येणार होती. हेल्पलाईनसह घरातून कोरोनाची टेस्ट करण्याची सुविधा पुढील ४८ तासांत सुरु होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने परिपत्रकाच्या माध्यमातून ४ दिवसांपूर्वी दिली होती. सध्याच्या घडीला इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या नोंदणीकृत खासगी लॅबमध्ये टेस्टला परवानगी देण्यात आली आहे.

मात्र कल्याण-डोंबिवलीतील लोकसंख्येचा विचार केल्यास आणि मागील काही दिवसात कोरोना संबंधित घडलेली प्रकरणं लक्षात घेता केडीएमसी हद्दीत देखील कोरोना संबंधित चाचणी करण्यासाठी खाजगी लॅबची गरज असल्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र देखील लिहिलं आहे.

 

News English Summary: A few days ago, the Indian Council of Medical Research (ICMR) approved the launch of a total of four private laboratory corona virus detection tests in the country. In this, Dr. Red Pathlabs, Drs. Includes Dang Lab, Indraprastha Apollo. ICMR approved six pathology labs on Sunday and ten pathology labs on Monday. However, considering the Kalyan-Dombivli population and taking into account Corona related cases in the past few days, MNS MLA Raju Patil has demanded the need of a private lab for testing Corona in KDMC area. In this regard, MLA Raju Patil has also written a letter to Chief Minister Uddhav Thackeray.

 

News English Title: Story Corona crisis MNS MLA Raju Patil requested CM Uddhav Thackeray for Covid 19 Test lab at Kalyan Dombivli News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x