27 April 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON
x

कर्तव्यावर हजारोंशी संपर्क; वनरुम'च्या घरात बाबा चिमुकल्यांना लांब ठेऊन जेवतो अन पुन्हा..

Corona Crisis, Maharashtra Police, Mumbai Police, Covid 19

नवी दिल्ली, २६ मार्च: देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, डॉक्टर्स आणि नर्सेसची अवस्था अत्यंत बिकट आहे आणि त्यात त्यांचे कुटुंबीय देखील भरडले गेले आहेत. विशेष म्हणजे राज्यातील पोलिसांचा रस्त्यावर कर्तव्य बजावत असताना हजारोंशी संपर्क होतं असून ते त्याला टाळू देखील शकत नाहीत.

अनेक पोलिसांची घर अत्यंत लहान आणि वनरुम किचनची असल्याने जेव्हा हेच ड्युटीवरील पोलीस मिळालेल्या वेळेत जेवणासाठी घरी जातं आहेत तेव्हा त्यांच्याकडे स्वतःच्या कुटुंबियांना कसं सुरक्षित ठेवावं हा प्रश्न भेडसावत आहेत. त्यातून जे शक्य होईल ते प्रयोग करून पोलीस घरातील बायको, मुलं आणि आई-वडिलांना जेवताना देखील काही अंतरावर ठेवत आहेत आणि लवकर जेवण आटपून पुन्हा कर्तव्यावर पळत आहेत. विशेष म्हणजे घराबाहेर पडताना स्वतःच्या मुलांच्या डोक्यावर हात फिरवण्यापासून देखील ते स्वतःला रोखत आहेत असं अनेकांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलं. अनेकांनी यावर मत मांडताना म्हटलं की जे शक्य आहे ते आम्ही कर्तव्य म्हणून बाहेर करत आहोत, मात्र आमची घरं लहान असल्याने स्वतःला मुलांपासून लांब ठेवण्याचे हेच छोटे पर्याय आहेत असं म्हटलं आहे.

 

News English Summery: Today is the second day of a nationwide lock down, and the number of coronary infections is increasing across the country. So far 606 people have been infected with Corona virus across the country, while 11 have died of the disease. Maharashtra has the highest number of patients in the country with 122. Meanwhile, Prime Minister Narendra Modi has announced a 21-day lockdown across the country to prevent the outbreak of the Corona virus. However, the condition of the police, doctors and nurses who provide essential services is in dire straits and their families are also enlarged. In particular, thousands of people are contacting the police in the state while performing their duty on the roads and they cannot even avoid it.

 

News English Title: Story Corona crisis Mumbai Police Lock Down tension News Latest Updates .

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या