31 January 2025 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | मालामाल करणार हा मल्टिबॅगर PSU शेअर, मिळेल मजबूत परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर मालामाल करणार, गुंतवणूकदार तुटून पडले, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीचे प्लॅनिंग करताय, मग 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, पैसा वेगाने वाढेल Loan EMI Alert | पगारदारांनो, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना या गोष्टींचे पालन करणे गरजेचे, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: GTLINFRA BHEL Share Price | कमाईची मोठी संधी, सरकारी कंपनीचा शेअर देईल 88 टक्के परतावा, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: BHEL BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: BEL
x

राज्यातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope, Corona Hotspot, Maharashtra

मुंबई, २३ एप्रिल: देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबापुरीला कोरोनाचा विळखा बसला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा रोज वाढत असताना, मुंबई महापालिकेने विभागवार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची यादी जाहीर केली आहे. ही यादी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी नक्कीच आहे.

मुंबई महापालिकेने बुधवारी कोरोनाबाधित लोकं बरे होऊन आपल्या घरी जातात याबाबतची आकडेवारी नकाशासह जारी केली आहे. या नकाशात सर्वात जास्त रुग्ण असलेल्या वरळी विभागात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या सर्वात जास्त असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. वरळी विभागातील ६७ रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान आता महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाले आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही.”

 

News English Summary: The number of Corona hotspots in Maharashtra has been reduced from 14 to 5. The number of coronary heart disease patients in the state has doubled to seven days. Corona is being prevented and treated by the state government as per the guidelines of the World Health Organization, ICMR. The state is not in a state of panic.

News English English: Story Corona hotspot count decreased in Maharashtra says health Minister Rajesh Tope News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x