15 November 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON
x

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर, १६२ रुग्णांना डिस्चार्ज

Covid19, Corona Crisis

मुंबई, ०९ एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उर्वरित पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अलसुरे येथील एका करोनाबाधित रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. करोनाचा रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच बळी आहे. गेल्या महिन्यात दुबईहून परत आलेल्या या रूग्णाला सोमवारी खेड तालुक्यातील कळंबणी येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दाखल करतानाच प्रकृती खालावलेली असलेल्या या रूग्णाचा मृत्यू ओढवला.

 

News English Summary: The outbreak of corona virus is increasing in the state. The number of patients and the number of patients is increasing day by day due to corona. On Wednesday, 162 new coronary patients were found in the state. Therefore, the number of coronaries in the state has reached 1297. So far, 117 coronary artery patients have been discharged home after being cured, informed the state health department.

News English Title: Story Corona virus 1297 patient in Maharashtra 117 new Corona virus positive cases Wednesday Covid19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x