15 November 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON
x

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा १००० पार; एकूण संख्या १०१८वर

Covid19, Corona Crisis, Maharashtra

मुंबई, ७ एप्रिल: करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असली तरी, या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं आता करोनाबाधितांचा आकडा १०१८वर गेला आहे. मुंबईत ११६ नवे रुग्ण सापडले आहेत.

राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. आज दिवसभरात मुंबईत ११६ रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६४२ पर्यंत पोहचली आहे. तर पुणे १८, अहमदनगर ३, बुलढाणा २, ठाणे – २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ अशाप्रकारे १५० नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर आतापर्यंत राज्यात ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सगळ्यांना पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केलं आहे. ट्विटर व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला आहे. सगळ्या उपाय योजना करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांनी घराबाहेर न पडून आम्हाला पूर्ण सहकार्य करावे असंही त्यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही मुंबईची चिंता वाढवणारी बातमीच समोर आली आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये १०० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

 

News English Summary: Although the state government is trying to prevent coronary disease on the battlefield, the outbreak does not seem to be decreasing. The number of coronaries in the state is increasing. Today, the state has added 150 new patients. As a result, the number of coronaries has now risen to 1018. 116 new patients found in Mumbai.

 

News English Title: Story Corona virus cases crosses 1000 mark in Maharashtra with 1018 patients Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x