आईचं ह्रदयविकाराने निधन, शेजाऱ्यांचा मदतीला नकार, मुस्लिम मित्र धावले आणि
कल्याण, २ मे: ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून ठाण्यातील रुग्णांचा आकडा २७९ पर्यंत, तर नवी मुंबईतील रुग्णांचा आकडा २०६ पर्यंत पोहोचला आहे. बुधवारी जिल्ह्यात ६४ नवे रुग्ण सापडले असून त्यात ठाणे आणि नवी मुंबईतील ४१ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे दररोज रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने या दोन्ही शहरांत करोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे.
त्या तुलनेत भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर तसेच अन्य शहरांसह ग्रामीण भागांत रुग्णसंख्येचा आकडा फारच कमी असल्याने येथील परिस्थिती काहीशी आटोक्यात असल्याचे चित्र आहे. मात्र सध्या कल्याण डोंबिवलीत देखील सामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचाच एक प्रत्यय कल्याणमध्ये आला आहे. म्हणजे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाला, पण कोरोनामुळे मृत्यू झाला असावा या भीतीने त्यांच्या शेजाऱ्यांनी देखील लांब राहणं पसंत केलं. पण दुसऱ्या बाजूला धावले ते त्याच घरातील मुलाचे इतर मुस्लिम मित्र.
झालं असं की ह्रदयविकारामुळे वयाच्या ७० व्या वर्षी प्रभा कलवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कलवार यांच्या मुलांनी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र शेजारी कोरोनाच्या भीतीपोटी पुढे आले नाहीत. अखेरीस मुलाच्या मदतीला त्याचे मुस्लिम समाजातील मित्र धावून आले. मुस्लिमांच्या मदतीने कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे दर्शन घडले. कलवार यांची दोन मुले परदेशात वास्तव्याला आहे. एक मुलगा नाशिक येथे राहतो. दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. कलवार या आजारी होत्या. त्या भोईवाडा येथे राहत होत्या. पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी त्यांच्या मुलांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र शेजाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही पुढे आले नाही. कलवार या पूर्वी रोहिदास वाड्यात राहत होत्या. त्याठिकाणी त्यांच्या मुलांचे काही मुस्लिम मित्र होते. सध्या रमजान सुरु असल्याने मुस्लिम बांधव पहाटेच उठतात. त्यांना रोझाची तयारी करावी लागते. कलवार यांच्या मुलाने आईची प्रकृती खालावल्याचे मित्र शाकीर शेख यांना कळवले. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी भोईवाड्यात धाव घेतली. शाकीर यांनी त्यांचे मित्र पप्पू शेख, तौसिफ बागवान, सलमान शेख, कमरुद्दीन शेख, फारीख बीजापूर यांच्या मदतीने रिक्षा करुन कलवार यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच कलवार यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. कलवार यांचा मृतदेह घरी नेल्यावर त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली.
हिंदू समाजात अंत्यविधी कसा केला जातो हे जाणून घेतले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत बैलबाजार स्मशानभूमीत कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. रजझानच्या पवित्र महिन्यात शाकीरसह त्यांच्या मुस्लिम बांधवांनी माणुकीचा धर्म जपला आहे.
News English Summary: Learned how funerals are performed in Hindu society. Following the physical distance, Kalwar’s body was cremated at Bailbazar Cemetery. During the holy month of Razzaan, Shakir and his Muslim brothers have practiced the religion of Manuki
News English Title: Story Corona Virus crisis Lockdown Muslims performed last rites of Hindu women in Kalyan News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO