15 November 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही: मुख्यमंत्री

Corona Crisis, Covid 19, CM Uddhav Thackeray

मुंबई, ४ एप्रिल: राज्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात ४७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणारच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोविडपासून महाराष्ट्राला वाचवणारच. मात्र दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. खोटे आणि उगाचच अफवा पसरवणारे दोन समाजांमध्ये दुहीचा व्हायरस पसरवणारे व्हिडीओ कुणी गंमत म्हणूनही पसरवत असेल तर त्यापैकी कुणाचीही गय केली जाणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंगापूरच्या पंतप्रधानांनी मंगळवारपासून लॉकडाऊन सुरु होणार आहे . देश कोणताही असो, जातपात धर्म कोणताही असो शत्रू एकच आहे. नाईलाजास्तव घरात राहावंच लागणार आहे. पंतप्रधानांशी चर्चा होत असते. सोनिया गांधी, शरद पवारांशी चर्चा झाली, अनेक धर्मगुरु, मौलवी यांच्याशी चर्चा सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने आवाहन करत आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार आहे. पण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काळजी घ्यायला हवी असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत राज्यात ५ लाखाच्या आसपास परराज्यातील मजूर वास्तव्यात आहे. त्यांना दोन वेळचं जेवण, डॉक्टर्स वैगेरे सुविधा दिल्या आहेत. कोणालाही कुठे जायची गरज नाही. आमच्या राज्यातील लोकांचीही इतर राज्यात काळजी घ्यावी. इतर राज्यात कोणीही माणूस अडकला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांची मदत करण्याबाबत त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

 

News English Summary: There is another virus that comes with two hands with Corona. Some people are trying to get the duo. Chief Minister Uddhav Thackeray has said that the burden of action will be laid on them. Covid will save Maharashtra. However, Chief Minister Uddhav Thackeray warned that action would be taken against those who spread the virus of rumors and rumors. The Chief Minister has also made clear that if anyone spreads the video of the virus in two societies that are spreading false and false rumors as a joke, then none of them will be harmed.

 

News English Title: Story corona virus I will save public corona will not leave you CM Uddhav Thackerays warning Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x