5 November 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

देशावर संकट असताना राजकारण करू नका; पवारांचा सबुरीचा सल्ला

Covid19, Corona Crisis, Lockdown, Sharad Pawar

मुंबई, १५ एप्रिल: कोरोनावर मात करताना सर्वांनी एकत्र राहुया, कोरोनावर मात करणं हे महत्त्वाचं असून राजकीय पक्षांनी राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. मंगळवारी वांद्र्यात घडलेला प्रसंग दुर्देवी असल्याचंही पवार म्हणाले. कोणीतरी अफवा पसरवल्याने गर्दी झाली. वांद्र्यासारखा प्रकार पुन्हा घडू नये, संभ्रम वाढेल अशा सूचना करु नका असंही ते म्हणाले.

राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात काही चुकीचं नाही. लोकशाहीत असा संघर्ष होतच असतो. पण सध्या देशात संकट असताा राजकारण करणं योग्य नाही. देशात कुणाचं सरकार आहे आणि राज्यात कुणाचं सरकार आहे, याचा विचारही मनात आणता कामा नये. करोनाचा पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असायला हवा, असं पवारांनी म्हटलं आहे.

संकटाच्या या काळात पंतप्रधान नरेद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार सातत्यानं संवाद साधत आहेत. आता लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. देशात वाढलेल्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या चिंताजनक आहे. जगातील स्थितीशी मी याची तुलना करणार नाही. पण, आपण नियमाचं पालन करायला हवं,’ असं पवार म्हणाले.

कोरोनामुळे राज्याच्या अर्थकारणाला मोठा धोका होऊ शकतो. उद्योग बंद असल्याने बेरोजगारीचं संकट वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही सीएसआर देण्याची मागणी पवार यांनी केली आहे. पिण्याचे पाणी कमी पडू नये, अन्नधान्य कमी पडू नये याची खबरदारी घेण्याचंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: NCP President Sharad Pawar said that it is important to overcome the corona while political parties should not do politics. He was speaking while interacting with the public via Facebook Live. Pawar said that the incident in the temple on Tuesday was unlucky. The rumor spread that someone was spreading it. He also suggested that the monkey-type should not happen again, that there would be confusion.

News English Title: Story Corona virus lockdown NCP President Sharad Pawar address to Maharashtra Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x