कोरोना आपत्ती: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 'या' सूचना मांडल्या...सविस्तर
मुंबई, ७ मे: राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. मंत्रालयात झालेल्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचनांची माहिती दिली.
त्या सूचना खालील प्रमाणे,
लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला, त्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने कोरोना जाणार नाही. लस येईपर्यंत कोरोना जाऊ शकत नाही.
परप्रांतीय कामगारांना परत आल्यावर तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये. कारण त्या राज्यात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे चाचण्या होत आहे. तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही. ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. तसेच त्याच वेळी त्यांची ‘राज्य स्थलांतरित कायद्या’ खाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो.
महाराष्ट्रातील कारखाने उद्योग बंद होऊ नयेत, म्हणून राज्यातील तरुण तरुणींना ज्या ठिकाणी रोजगार उपलब्ध आहेत त्याची माहिती द्यावी. आपल्याकडे विदर्भ मराठवाडा याठिकाणी त्यांना रोजगाराविषयी माहिती नसते.
छोटे दवाखाने सुरु करावेत. आजारी पडल्यानंतर दाखवायचं कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी एखादा पोलीस असावा. कारण रांगा लागतील तेव्हा नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस असावा
गेले दीड महिना पोलीस थकले आहेत, तेही प्रचंड तणावाखालून गेले आहेत. काही ठिकाणी पोलिसांना गृहीत धरलं जात आहे. अशा ठिकाणी एसआरपीएफ तैनात करावे. त्यामुळे दरारा निर्माण होईल. जेणेकरुन लोक बाहेर येणार नाहीत.
सरकारी कर्मचारी, पोलीस ते सफाई कामगार अशा अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घ्या. सफाई कामगार आजारी पडत आहेत, त्यांनी हात वर केले, तर शहरांची अवस्था काय होईळ? त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या
रमझानची वेळ सुरु आहे. अनेक ठिकाणी गर्दी होते. लोक बाहेर पडतात. अनेक सण घरात राहून साजरे केले. त्यामुळे मुस्लिम समाजानेही त्याचा विचार करावा. जर विचार होत नसेल तर या ठिकाणी अधिक फोर्स लावणे गरजेचे आहे. जेणेकरुन या गोष्टी बंद होतील.
स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना घरी जाण्यासाठी किंवा जे लोक हॉस्टेलमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काही व्यवस्था करता येईल ती करावी
शाळा कशाप्रकारे सुरु करणार. ई लर्निंग वगैरे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. शहरातही अनेक ठिकाणी अशक्य आहे. ती बाब पालकांपर्यंत पोहोचवणं.
News English Summary: Against the backdrop of the growing corona crisis in the state, Chief Minister Uddhav Thackeray today convened a meeting of all party leaders. MNS president Raj Thackeray, Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis and Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar were present at the meeting. After the meeting, Raj Thackeray interacted with journalists and informed them about the suggestions made to the Chief Minister.
News English Title: Story corona virus MNS Chief Raj Thackeray gives suggestions CM Uddhav Thackeray about migrant News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार