22 January 2025 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

शहरात चिकन-भाजीपाला महाग, पण शेतकऱ्यांना पैसा मिळतोय कुठे: आ. रोहित पवार

MLA Rohit Pawar, Corona Virus, Farmers

मुंबई, ०१ एप्रिल: कोरोनाच्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने अनेक तालुक्यात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मोठ्या हिंमतीने शेतकऱ्यांनी रबी हंगामात उसणवार करून पिकांची पेरणी केली. मात्र काढणीला आलेल्या विविध ठिकाणची अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत आणि त्यात कोरोनाची आपत्ती असा संकटात शेतकरी अडकला आहे.

कोरोना आपत्तीपूर्वी अजित पवार यांनी ११ हजार ४६८ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. १५ मार्च रोजी अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली होती की, “महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. १३ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे”.

त्यानंतर राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख, तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत असंही अजित पवार यांनी सांगितले आहे.

मात्र आता त्यात भर म्हणजे लॉकडाऊनसारख्या आणिबाणीच्या काळातही अनेकजण स्वार्थ साधून स्वत:चे हित पाहत आहेत. समाजाशी आपलं काहीही देणं-घेण नाही, अशाच अविर्भावात हे लोक वागत आहेत. त्यामुळेच, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव पडले असून चिकनचेही भाव गडगडले आहेत. मात्र, ग्राहकांना या कमी भावात हे पदार्थ मिळत नाहीत. ग्राहकांना सध्याच्या दरांपेक्षा अधिक भाव देऊन हे पदार्थ घ्यावे लागत आहेत. याचाच अर्थ, व्यापारी किंवा यामधील साखळी असलेले दलाल या संवेदनशील परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. याबाबत आमदार रोहित पवार यांनी काळजी व्यक्त करत, हे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

 

News English Summary: But now the emphasis is on lock down and even in times of crisis, many are taking selfish interest. They have nothing to do with society, they are acting in such a way. Due to this, the milk prices of the common farmers have fallen and the prices of chicken have also fallen. However, consumers do not get these foods at these low prices. Consumers have to take these foods at prices higher than current rates. This means that traders or brokers in the chain are taking advantage of this sensitive situation. MLA Rohit Pawar expressed concern over this, saying it was not appropriate.

 

News English Title: Story Corona virus not right MLA Rohit Pawar gets angry traders who exploiting farmers situation Lock down News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x