20 April 2025 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

चिंता वाढली! एका दिवसात महाराष्ट्रात १२३३ नवे कोरोना रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू

Covid 19, Corona Crisis, Corona Vaccine

मुंबई, ६ मे: कोरोना व्हायरसनं देशात तसंच राज्यात थैमान घातलं आहे. देशात, राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दरम्यान एका दिवसात महाराष्ट्रात तब्बल १ हजार २३३ नवे रुग्ण समोर आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर दिवसभरात ३४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने कंपन्या, कामांसाठी शिथिलता दिलेली असताना आता रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईतील धारावीचा झोपडपट्टी भागामध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ६८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ७३३ झाला आहे. तर एकूण मृत्यूंची संख्या २१ झाली असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या आता १६ हजार ७५६ वर पोहोचली आहे. राज्यात एका दिवसात १ हजार २३३ करोनाचे नवे रुग्ण सापडले असून ३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी राज्यातील ७०० करोनाग्रस्तांना उपचारानंतर बरं करून घरी सोडण्यात आल्याचं यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

 

News English Summary: Corona virus has spread in the country as well as in the state. In the country, the number of corona victims is increasing in the state. Meanwhile, in a single day, 1,233 new patients came forward in Maharashtra, informed Health Minister Rajesh Tope. It is also said that 34 crore victims died during the day.

News English Title:  Story Corona virus Patient Number And Death Increased In Maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या