15 January 2025 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

कोकणातून आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना, ग्रीन झोन संकटात

Konkan, Sindhudurg, Mango Truck Driver, Covid 19

सिंधुदुर्ग, ५ मे: राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत राज्यातील आकडेवारीची माहिती दिली आहे. यानुसार सोमवारी महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण आढळले. तर ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत एकाच दिवसात ३३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे याच झोपडपट्टीतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता ६६५ वर पोहोचला आहे आणि ही मुंबईसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबई महापालिकेने याबाबतीत माहिती दिली आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी नव्याने आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. त्यातील एका रुग्णाला यापूर्वीच बरा होऊन घरी सोडण्यात आले आहे. तर एक रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल आहे.

आज नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. सदर रुग्ण हा दिनांक २४ एप्रिल रोजी मुंबई येथून परत आला. त्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मुंबई येथील हॉटस्पॉटमधून आल्यामुळे त्याचा दिनांक २ मे रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आता त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील या रुग्णाचे गाव कॉन्टेन्मेंट झोन केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

या घटनेवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील जिल्ह्या प्रशासनावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ‘सिंधुदुर्ग मध्ये करोना नाही पण प्रशासनाच्या हलगर्जी मुळे अजून एक रुग्ण सापडला आहे! जिल्हा प्रशासनाने घरी सोडलेला व्यक्तीला करोना झाले असे समजते..आंबा वाहतुक करणाऱ्या ड्राईव्हर बदल सांगुनही लक्ष दिले नाही..ग्रीन झोनचे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा रेड झोन कडे वाटचाल करत आहे!!

 

News English Summary: Another corona-infected patient was found in Sindhudurg district on Tuesday. As a result, the number of corona patients in the district has now tripled. One of the patients has already been cured and released home. So one patient is admitted in the isolation ward of the district general hospital.

News English Title: Story corona virus third covid 19 patient found Sindhudurg total number three News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x