12 January 2025 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 99% प्रवाशांना ठाऊक नाही रेल्वे तिकीट बुकिंगची ही ट्रिक, स्लीपर तिकिटाच्या पैशांत AC प्रवास करू शकाल EPFO Minimum Pension | खाजगी पेन्शनधारकांना दरमहा किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार, महत्वाची अपडेट आली Bank Account Alert | बँक बचत खात्यात 'या' पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू नका, केला तर इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Business Idea | महिला आणि तरुण सुद्धा घरातून सुरु करू शकतात 'हा' डिमांडिंग व्यवसाय, महिना लाखोत कमाई होईल Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
x

नगरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण; संपर्कातील ९ जण सुद्धा ताब्यात

Corona Crisis, Covid 19, Maharashtra, Rajesh Tope

अहमदनगर, २९ मार्च: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील १४ रुग्ण, पुण्यातील १५, नागपूरमधील १, औरंगाबाद १, यवतमाळमधील ३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९६ वर गेली आहे.

दरम्यान, नगरमध्ये आणखी दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही परदेशी नागरिक असून, एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत माहिती दिली.

नगर जिल्ह्यामध्ये हे दोघे जण कामानिमित्त आले होते. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना देखील प्रशासनाने ताब्यात घेतले असून, त्यांचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी तीन करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या पाच झाली असून, त्यापैकी एक रुग्ण बरा झाला असून त्याला आजच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

News English Summary: Two more coronary patients have been found in the city. Notably, both are foreign nationals, one is from France and the other is from the Ivory Coast. District Collector Rahul Dwivedi informed about this. These two men came to work in the city district. Nine persons who came in contact with these persons have also been detained, and their discharge has been sent to Pune for examination. Meanwhile, three coronary artery patients were previously found in the city district. As a result, the total number of coronary patients has increased to 5, one of them has recovered and was discharged from the hospital today.

 

News English Title: Story corona virus two more person Covid 19 test report positive cases rise to 196 in Maharashtra News latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x