23 February 2025 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

डोंबिवली: तो तरुण कोरोना पॉझिटिव्ह असून हळदी व लग्नाला गेला...नंतर मेसेंजरवर मित्रांना

Corona Crisis, Dombivli

डोंबिवली, २७ मार्च : महाराष्ट्रात कोरोना रुग्णावर मेडिकल एज्युकेशन अँन्ड ड्रग्स विभागाने अभ्यास केला. त्यांच्या अहवालानुसार यात १२२ रुग्णांचा समाविष्ट करण्यात आला आहे. यामधील ३३ रुग्णांचे वय ३१ ते ४० वयोगटातील आहे. तर २१-३० आणि ४१-५० वयोगटातील रुग्णांची संख्या प्रत्येकी २४ इतकी आहे. तर ५१ ते ८० वयोगटातील संख्या ३१ आणि १ ते २० वयोगटातील संख्या १० आहे.

राज्यात एकूण आढळलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के लोक परदेश दौरा करुन आले होते. राज्यात ६९ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. १२२ रुग्णांपैकी ५४ टक्के लोक परदेशातून मायदेशी परतलेले आहेत. सध्या भारत कोरोनोच्या गंभीर स्तरावर आहे. सध्या देशात ७२४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यातील ६६ जणांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे. तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आठव्या आठवड्यात हा व्हायरस झपाट्याने पसरत जातो.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकांनी एका ठिकाणी गर्दी करू नये म्हणून लॉकडाउन आणि संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, डोंबिवलीमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने तर कहर केला आहे. डोंबिवलीत एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. हा तरुण डोंबिवली पूर्वे भागात राहत असून तो तुर्कस्तान फिरायला गेला होता. तो मुबंई परत आल्यावर त्याला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितलं होतं. मात्र, तसं असून सुद्धा तो एका लग्नात आणि हळदी मध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, त्याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती मेसेंजरवर आपल्या मित्रांना दिली आणि आपण दाखल झालो आहोत याची माहिती सुद्धा दिली. हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. आता हा तरुण जिथे गेला तिथे पालिकेकडून फवारणी आणि तेथील नागरिकांची तपासणी चालू आहे, असं एका नगरसेवकाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितलं.

याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांने याला दुजोरा दिला आहे. मात्र, कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला.आधीही डोंबिवलीमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. आता कल्याण-डोंबिवली कोरोनाग्रस्तांची संख्या ६ वर पोहोचली आहे. यातील २ रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावे, असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

 

News English Summary : In Maharashtra, the number of coronavidated patients is increasing day by day. A lockdown and a ban has been announced to prevent people from crowding in one place. However, the corona virus patient found in Dombivali is suffering. Information about a coronary infection has been reported in Dombivli. The young man, who lives in the eastern part of Dombivali, had traveled to Turkey. When he returned to Mumbai, he was asked to remain a Home Quarantine. However, it is reported that he has gone to a wedding and turmeric. Most notably, he informed you that he was coroner to his friends on Messenger and that he had also been admitted. Dombivali has only one sensation since this young Corona was found positive. Now, wherever this young man goes, spraying from the municipality and checking the citizens there is ongoing, ”said a councilor on condition of anonymity.

News English Title: Story corona virus update lock down Dombivlikar youth attend marriage and message to friends and tell me corona News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x