19 April 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट
x

ठाण्यातील रांजणोलीत १,००० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर उभं राहणार

Thane District, Kalyan Dombivli, Covid 19, Corona Crisis

ठाणे, ५ मे: ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रांजणोली येथे एक हजार खाटांचे सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा आमंत्रा या गृहसंकुलाच्या आवारात हे केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गाला लागूनच ही व्यवस्था उभी केली जात असून ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर आणि ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे पोहचणे शक्य होणार आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा एक हजारांहून अधिक झाला आहे. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने १ हजार खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा आमंत्रा या गृहसंकुलातील अनेक इमारती रिकाम्या असल्याने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर शहरांतील करोना संशयीतांसाठी विलगीकरण कक्ष तयार केले होते. आता तिथे कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी सांगितले.

दुसरीकडे विप्रो लिमिटेड कंपनीने पुणे येथे ४५० खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र शासनासमवेत केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ४५० खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे कोविड १९ साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल.

 

News English Summary: Considering the increasing number of corona patients in Thane district, the district administration has started a movement to set up a 1,000-bed covid 19 center at Ranjanoli. The center will be set up in the premises of the Tata Amantra housing complex.

News English Title: Story Covid 19 Center Equipped With One Thousand Beds At Ranjnoli News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या