5 November 2024 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

राज्यातील स्थितीवरून केंद्रीय आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार

Covid 19, Corona Crisis, Corona Vaccine

नवी दिल्ली, ६ मे: कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु आहेत. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे येथील आझम कॅम्पसमधील मस्जिदमध्ये कोविड-१९ विरुद्ध लढण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री बैठक बोलावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार आहेत. “महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी ३४ जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची स्थिती चिंता व्यक्त करावी अशीच आहे.

राज्यात होत असलेला करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुढे काय करता येईल, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक बोलावणार आहोत. त्या बैठकीत आगामी नियोजनासंदर्भात कृती धोरण ठरवलं जाईल,” असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

राज्यात मंगळवारी ८४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्येने १५ हजार ५२५ चा आकडा गाठला आहे. तर दिवसभरात ३४ मृत्यू झाले असून बळींचा आकडा ६१७ वर पोहोचला आहे. कोरोनाच्या कठीण समयी दिलासाजनक बाब म्हणजे, राज्यात दिवसभरात ३५४ तर आतापर्यंत २ हजार ८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत मंगळवारी ६२५ रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्येने ९ हजार ९४५ चा टप्पा गाठला आहे. शहर उपनगरात दिवसभरात २६ मृत्यू झाले असून कोरोनाचे एकूण ३८७ बळी गेले आहेत.

 

News English Summary: Union Health Minister Dr. Corona on the situation created in Maharashtra. Harsh Vardhan has expressed concern. In this regard, the Union Health Minister will convene a meeting and discuss with Chief Minister Uddhav Thackeray soon.

News English Title: Story Covid 19 Situation In Maharashtra Matter Of Concern Will Hold Meeting With Cm Says Health Minister News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x