15 January 2025 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

६ महिन्याच्या बाळासमोर कोरोना पराभूत...डिस्चार्ज; वाढवला सामान्यांचा आत्मविश्वास

Dombivli corona crisis

डोंबिवली, १६ एप्रिल : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आतापर्यंत ६० रुग्णांपैकी २० जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात ६ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. मागील चार ते पाच दिवसात कल्याण-डोंबिवलीतील जवळपास ९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

विशेष म्हणजे कोरोनावर मात करणारे ६ महिन्याचे बाळ सुद्धा बरे झाले आहे. त्याचे वडील सुद्धा बरे होऊन घरी आले आहेत. एवढंच नाहीतर या बाळाच्या आजीला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या सहा महिन्याच्या बाळाच्या प्रकृतीबद्दल त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. त्यामुळे या चिमुकल्याने धास्तावलेल्या नागरिकांचा आत्मविश्वास वाढवल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं तीन हजारचा टप्पा ओलांडला आहे. मागील १८-२० तासांत राज्यभरात तब्बल १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ३०८१ झाली आहे. नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये एकट्या मुंबईतील १०७ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यात १९ रुग्ण वाढले आहेत. नागपूर महापालिकेच्या हद्दीत १० रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात एक जण कोविड पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबई व वसई-विरारमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.

 

News English Summary: In Maharashtra, the number of coronavirus patients is increasing day by day. While the number of coronary patients is increasing in Mumbai and the suburbs, the number of coronary patients is also comforting. Of the 60 patients so far in Kalyan and Dombivali, 20 have beaten Corona. This includes a 6 month old baby. Corona-infected patients in Kalyan-Dombivali Municipal limits are now recovering. So far, 20 of the 60 patients have received discharge. In the last four to five days, around 9 people have been discharged.

News English Title: Story Dombivli 20 people with 6 month old baby will beat corona Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x