24 November 2024 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

कोरोना आपत्ती: सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय नाही: मुख्यमंत्री

News Latest Updates, Corona Crisis, Maharashtra Govt Office shutdown

मुंबई, १७ मार्च :  देशातल्या वाढत्या प्रादुर्भावाचं महाराष्ट्र केंद्र बनत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. शहरं बंद करायची का, वाहतूक व्यवस्था बंद करायची का याविषयी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पण सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात ३९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना लागू केल्या जात आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनानं सुरूवातीच्या टप्प्यात शाळा, महाविद्यालयांना सुटी, चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स यासह गर्दी होणाऱ्या संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले.

करोनाचा धोका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत राजधानी, डेक्कन, प्रगती, दुरांतो एक्स्प्रेससह एकूण २३ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. करोना संसर्ग टाळणे आणि प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत या गाड्या रद्द राहणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे सेवेसह सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला रेल्वेचे अधिकारीदेखील उपस्थित आहेत. रेल्वे, मेट्रो, बस सेवा पूर्णपणे बंद केली जाणार की त्यांची संख्या काही प्रमाणात कमी केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज सकाळीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबद्दलचे संकेत दिले होते. रेल्वे, मेट्रोचा विषय थेट माझ्या खात्याशी संबंधित नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं टोपेंनी सांगितलं होतं.

 

News English Summery: Maharashtra is becoming the center of the increasing prevalence in the country. The state government has taken huge steps to curb the spread of this deadly virus. An urgent meeting of the cabinet was called to close the cities or to close the transportation system. It has not yet been decided on the transport system. But no decision has been made to close the government office, he said.

 

News English Title: Story government offices close 7 days state government takes big decision curb Corona virus crisis News Latest updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x