15 January 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

श्रीमंतांकडे समूह प्रवास परमिट आणि गरिबांनी अंतर राखा...सचिवामुळे सरकार गोत्यात

Corona Crisis, Wadhawan family, Amitabh Gupta

मुंबई, १० एप्रिल: लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात वाधवान यांना महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणे गृह मंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिवांना चांगलेच भोवले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट करत कायदा सर्वांसाठी समान असल्याचे नमूद केले. विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबातील २३ लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे.

 

News English Summary: With the lockdown being enforced, 23 people, including Kapil Wadhwan of the DHFL, have been agitated when the case came to Mahabaleshwar for vacation. Notably, Amitabh Gupta, Principal Secretary to the Home Department of the state has revealed that the Wadhwan family has been given permission to visit Mahabaleshwar. From this, the government has sent Amitabh Gupta on a forced leave as soon as the opposition holds the government on edge.

News English Title: Story home secretary Amitabh Gupta has been sent compulsory leave until inquiry Wadhawan Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x