9 January 2025 8:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

वयाच्या या टप्प्यात व्हिजन सांगणं योग्य नाही, आता तरुणांना व्हिजन द्यायचं: शरद पवार

Sharad Pawar, Social Politics

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणातल्या नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदम्यानही त्यांनी सक्रिय निवडणुका आता लढणार नाही असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या आणि नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात ते बघायचं. त्यांच्या कामात फार काही हस्तक्षेप करायचा नाही. कारण न विचारता सतत सांगत गेलं की मान राहात नाही असंही त्यांनी सांगितलं.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यानही त्यांनी सक्रीय निवडणुका आता लढणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या व नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं व ते काय करतात हे पाहायचं, ते करत असलेल्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझाच्या “माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन” कार्यक्रमात ते बोलत होते. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहत असतो, त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणं व सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं योग्य नसतं, त्यामुळं तुमचा मान राहत नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, रिमोट माझ्या हातात नाही, आम्ही सरकार उभं केलं आहे, विचारल्याशिवाय मत द्यायचं नाही ही माझी भूमिका आहे, तर राज्याच्या हिताबाबत काही सूचना द्यायचा असेल तर पक्षाच्या अंतर्गत चर्चा होते. केंद्र सरकारच्या बाबतीत महाराष्ट्राची भूमिका मांडायची असेल तर सगळेच एकत्र येतो. मार्क देण्यासाठी परीक्षेची वेळ आली नाही, पण उद्धव ठाकरेंचा मार्ग योग्य आहे असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले.

 

Web Title: Story indication of NCP President Sharad Pawars new role in politics and social politics.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x