23 February 2025 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

समस्त पृथ्वीवरच नैसर्गिक रोगराईचं संकट, भेंडवळचं भाकित

Corona Crisis, Covid 19, bhendwal bhavishaywani

बुलढाणा, २७ एप्रिल: इतर देशांपेक्षा भारतातील कोरोनाव्हायरस घातक नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. मात्र काही राज्यांमधील कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा घातक स्ट्रेन सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशात गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरने (Gujarat Biotechnology Research Centre – GBRC) नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, चीनच्या वुहानमध्ये जो घातक असा L टाइप (L strain) कोरोनाव्हायरस दिसून आला तोच गुजरातमध्येही आहे आणि गुजरामधील मृत्यूदर जास्त असण्यामागे हेच कारण असू शकतं. तर दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाव्हायरसचा S स्ट्रेन (S strain) दिसून आहे, जो L पेक्षा कमजोर आहे आणि त्यामुळेच केरळमधील मृत्यूदर कमी असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. एकूण जगात आता अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना राज्यातील बुलढाणा येथील प्रसिद्ध भविष्यवाणीची परंपरा असलेल्या भेंडवळचं भाकित समोर आलं आहे.

त्यानुसार यावर्षी चारही महिन्यात पाऊस सर्वसाधारण आणि चांगल्या स्वरुपात राहिल. अतिवृष्टी आणि नासाडीही होईल. पृथ्वीवर नैसर्गिक रोगराईचे संकट येईल आणि देशाची आर्थिक स्थितीही कमकुवत होईल असा अंदाज या भाकितात नोंदवण्यात आला आहे. तसेच आर्थिक स्थिती खालावल्याने तणाव वाढेल. परकियांची घुसखोरी होईल आणि संरक्षण खात्यावर ताण राहिल. तसंच त्यामुळे त्रास सहन करावा लागेल असंही या भाकितात म्हटलं आहे. सारंगधर महाराज यांनी हे भाकित वर्तवलं आहे.

 

News English Summary: The tradition of bhendwal bhavishaywani prediction has continued as their predictions have now come to the fore. Rainfall will be normal and good in all four months of this year. There will also be excess rain and destruction. The prediction is that there will be a natural disease crisis on Earth and the country’s economic situation will weaken.

News English Title: Story Maharashtra bhendwal bhavishaywani prediction for rain earth and world corona crisis News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x