शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
मुंबई: महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची दुसरी यादी शनिवारी जाहीर झाली. या यादीत तब्बल २२ लाख शेतकर्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी ३५ लाख शेतकर्यांपैकी केवळ १५ हजार ५५८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता दुसरी यादी २२ लाख शेतकऱ्यांची जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सोमवारी यासंदर्भात अधिवेशनात माहिती देण्याची शक्यता आहे.
या यादीत नगर जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार शेतकरी तर वर्धा जिल्ह्यातील ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या बाबुडी घुमट व विळद या दोन गावांतील शेतकऱ्यांना तुर्तास कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यातील १५४ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. दुसऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ हजार ९१३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीच्या यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांना मेसेज गेल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, या यादीतील शेतकऱ्यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ४४९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे ६ जिल्ह्यांमधील गावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत असे सहकार विभागाने सांगितले आहे. या प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्यापारी बँका २४ तासांमध्ये तर जिल्हा मध्यवर्ती बँका ७२ तासांमध्ये रक्कम जमा करणार आहेत.
News English Summery: The second list of beneficiaries of the farmers’ loan waiver scheme announced by the Alliance for Development was announced on Saturday. The list comprises of over 22 lakh farmers. On the first day of the budget session, on 24th February the first day of the budget session, the government had announced the first list of only 15 thousand 558 farmers. The protests were strongly criticized. Therefore, the second list has been announced for 22 lakh farmers. This has given a great relief to the farmers in the state who are in financial distress. Cooperation Minister Balasaheb Patil is likely to inform about this at the convention on Monday.
Web News Title: Story Maharashtra Mahavikas Aghadi Government farmers loan waiver scheme second list announced.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO