12 January 2025 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील SBI Bank Scheme | SBI बँकेच्या नव्या योजनेचा फायदा घ्या; केवळ 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून बनाल लाखांचे मालक
x

आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आवश्यक पदवी नसताना व कोरोनावरील विधानावर नोटीस

Maharashtra Medical Council, Doctor Anil Patil, Got Legal Notice, News latest Updates

मुंबई, १७ मार्च: चीनमधून आलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत ७ हजार १५८ लोकांचा जीव घेतला आहे. तर १.८० लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी (साथीचा रोग) जाहीर केला आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूमुळे ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीची मानवावर चाचणी घेण्यास अमेरिकेतील सिएटलमध्ये सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. अर्थात ही लस सर्वसामान्यांसाठी बाजारात यायला आणखी दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. वेगवेगळ्या चाचण्यामध्ये यशस्वी ठरल्यानंतर आणि आवश्यक मान्यता मिळाल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होईल. या लसीचे नाव mRNA-1273 असे असून अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ती विकसित केली आहे. जैवतंत्रज्ञानातील अमेरिकी कंपनी मॉडर्ना यांचेही सहकार्य ही लस तयार करण्यासाठी घेण्यात येत आहे.

तसेच, कोरोनाव्हायरसचा प्रसार महाराष्ट्रात दिवसेंदिवस वेगाने वाढतो आहे. शहरांमधल्या शाळा, महाविद्यालयं आणि सार्वजनिक स्थळं बंद केली तरी सर्वच कर्मचारी घरून काम करण्याची सोय वापरू शकत नाहीत. आता खुद्द मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनीच आम्हाला घरून काम करू देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मंत्रालयातल्या एका विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळेच महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.

मात्र असं असताना देखील करोना व्हायरसला गांभीर्याने घेऊ नका असं सांगत चुकीची माहिती पसरवणाऱ्या डॉक्टरला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) नोटीस पाठवली आहे. दादरमध्ये काम करणाऱ्या या डॉक्टरचं नाव अनिल पाटील असं आहे. डॉ. अनिल पाटील यांनी काही मुलाखतींमध्ये करोनाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं सांगत चुकीची माहिती दिली होती. याची दखल घेत एमएमसीने नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे.

या नोटीसवर एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, ‘एमएमसी नोंदणीकृत डॉक्टर राज्य आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या शिफारशी आणि मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात बोलू शकत नाही. आम्ही डॉ. पाटील यांच्याकडून स्पष्टीकरण पाठवलं आहे. त्यावर समाधान न झाल्यास एमएमसीच्या संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.’ दरम्यान, आवश्यक ती पदवी नसतानाही पाटील स्वतःला आयुर्वेदिक डॉक्टर का म्हणून घेतात यावरही एमएमसीने स्पष्टीकरण मागवलं आहे. पाटील यांची नोंदणी एमएमसीकडे एमबीबीएस पदवीधारक म्हणून आहे. त्यामुळे यानुसारच व्यवसाय करायला हवा.

पाटील यांनी काही मुलाखतींमध्ये आश्चर्यकारक दावे केले. ते म्हणाले, ‘हा करोना व्हायरस आणि त्याविषयीची भीती निरर्थक आहे. हा व्हायरस उन्हाळ्यात टिकूच शकत नाही. करोना हे संकट नसून चीनची लहर आहे, ज्याचा उद्देश लस आणि मास्कची विक्री वाढवणं हा आहे.’ करोनाविषयी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचं आपण लेखी द्यायला तयार असल्याचंही डॉ. पाटील म्हणाले होते.

 

News English Summery:  A notice has been sent by the Maharashtra Medical Council (MMC) to a doctor spreading false information stating that he should not take the Corona virus seriously. Doctor Anil Patil is a doctor working in Dadar. Dr. Anil Patil had given false information in some interviews, saying that he did not have to take Karona very seriously. Taking notice of this, the MMC has sent a notice asking for clarification. On this notice, the Chairman of the MMC Dr. Shivkumar Utture said, ‘Registered doctors of the MMC cannot speak against the recommendations and guidelines issued by the state and central government. We thank Dr. An explanation has been sent from Doctor Anil Patil. If it is not satisfied then the crime will be registered according to the relevant laws of the MMC. Meanwhile, the MMC has also sought clarification on why Patil considers himself an Ayurvedic doctor even though he does not have the required degree. Doctor Anil Patil is registered with the MBC as an MBBS graduate. So, according to this, business should be done.

 

News English Title: Story Maharashtra Medical Council sent legal notice to doctor Anil Patil who spread false about corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x