राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये - संजय राऊत

मुंबई, १९ एप्रिल: शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर घेण्याची मंत्रिमंडळाने शिफारस करुनही राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. यावरुन राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’, असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. असंविधानिकरित्या वागणाऱ्यांना इतिहास माफ करत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये.
का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे.
समझने वालों को इशारा काफी है!— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2020
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर काही दिवसांपूर्वी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं टीका केली होती. राज्यपाल भवनातून काड्या करण्याचे उद्योग केले जात असल्याचं शिवसेनेनं म्हटलं होतं. त्यानंतर रविवारी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपाचं नाव न घेता ट्विट करून टीका केली आहे.
Raj bhavan , governor’s house shouldn’t become center for political conspiracy. Remember ! history doesn’t spare those who behave unconstitutionally .
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2020
दुसरीकडे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी देखील राज्यपालांनी कटुता, सुडबुद्धी न बाळगता विधान परिषद सदस्यत्वासाठीची शिफारस मंजूर करावी, असं मत व्यक्त केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी क्षत्रिय व्हावं, विरोधक होऊ नये. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन उद्धव ठाकरेंसाठी परवानगी आणावी, असं देखील काकडेंनी म्हटलं आहे.
News English Summary: Shiv Sena leader and Rajya Sabha member Sanjay Raut has indirectly criticized Governor Bhagat Singh Koshari. The cabinet has not yet decided on the recommendation of the Cabinet to appoint Chief Minister Uddhav Thackeray as the appointed member of the Governor. Raut has targeted the governor.
News English Title: Story Maharashtra Ra Bhavan should not be center for political conspiracy says Shivsena MP Sanjay Raut News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE