19 January 2025 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

आमदार निधी थेट ३ कोटीवर; भाजप आमदारांची अर्थमंत्र्यांशी जवळीक वाढणार?

Finance Minister Ajit Pawar

मुंबई: ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्यादा 7 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिक, बेरोजगार तरुण यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ सदस्य म्हणजेच आमदारांना मोठा दिलासा दिला. त्यांच्या निधीत थेट ५० टक्के वाढ केल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी २०११ सालीही आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना आमदारांच्या स्थानिक विकास निधीत ६० लाखांची वाढ केली होती. त्यावेळी हा निधी दीड कोटी रूपयांवरून २ कोटी रूपये करण्यात आला होता. आता पुन्हा तो योग जुळून आला. अर्थमंत्री म्हणून अजित पवार अर्थसंकल्पाचे भाषण करत होते. त्यांनी याहीवेळी आमदारांच्या निधीत भरघोस वाढ केली. आता आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरून तीन कोटी करण्यात आला आहे.

अजित पवार हे राज्यातील दिग्गज नेते समजले जातात आणि त्यांचे अनेक पक्षातील आमदारांशी चांगले राजकीय संबंध आहेत. महाविकास आघाडीत देखील त्यांचं स्थान हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचं आहे हे देखील लपून राहिलेलं नाही. राज्यातील अर्थ खातं त्यांच्याकडे असल्याने भाजपच्या आमदारांची त्यांच्याशी अजून जवळीक वाढेल असं दिसतं, त्यामुळे भाजपाची देखील भविष्यतील धाकधूक वाढल्याचं म्हटलं जातं आहे.

 

News English Summery: While presenting the first budget for the development, Finance Minister Ajit Pawar gave a big relief to the members of the Legislature. Ajit Pawar has announced a direct 50 per cent increase in their funds. Ajit Pawar, while presenting the budget of the alliance government in 2011, had increased the MLA’s Local Development Fund by 60 lakhs. At that time, the fund was raised from Rs 1 crore 50 lakh to Rs 2 crore. Now that yoga is back again. As Finance Minister Ajit Pawar was addressing the budget. He also increased the funds of MLAs at this time. Now the local development funds of MLAs have been increased from two crores to three crores.

 

Web News Title: Story Maharashtra State Budget 2020 Finance minister Ajit Pawar decided to increase MLA Funds worry for BJP Party.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x