16 January 2025 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा होणार नाही

Covid19, Corona Virus, Corona Crisis, 10th Standard Exams

मुंबई, १२ एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून स्थगित केलेला इयत्ता दहावीचा बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. बोर्डाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर इयत्ता नववी आणि अकरावीची परीक्षाही होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

राज्यातील १८ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास या विषयांचे पेपर दिले होते. केवळ भूगोलाचा पेपर राहिला होता. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन स्थितीत ३० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, ‘इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्यांना एका व्हिडिओद्वारे या निर्णयांची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, “राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यासाठी पहिल्या सत्राचा आधार घेतला जाणार आहे. पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या आणि प्रात्याक्षिके व अंतर्गत मूल्यमापन करून या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. याशिवाय इयत्ता दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले आहे.”

 

News English Summary: The paper for the Class X board geography, which has been postponed to prevent the spread of the corona virus, has finally been canceled. On Sunday, Minister of School Education Varsha Gaikwad announced a major and important decision on Sunday. He further said that further action would be taken as per the rules of the board. He also said that there would be no examination for Class XI and XI.

News English Title: Story Maharashtra state government cancelled geography paper of class 10th amid outbreak of Corona virus Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x