20 April 2025 7:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

पालघर नव्हे तर दादरा नगरहवेली-महाराष्ट्राच्या सीमेवर घटना घडली; हत्या प्रकरणी ११० जणांना अटक

Palghar Incident, Covid 19, Corona Crisis

पालघर, २० एप्रिल: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

चोर असल्याच्या अफवेमुळे प्रवास करणाऱ्या तिघांची जमावाने निर्घृण हत्या केली होती. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला होता. यात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज (वय ३५), चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (७०) या दोघांसह गाडीचा चालक नीलेश तेलगिडे (३०) या तिघांची गावकऱ्यांनी कुऱ्हाडी, काठ्या आणि कोयत्याने हत्या केली होती. कासा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून ११० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

कांदिवली येथून सुरतला निघालेल्या सुशीलगिरी आणि कल्पवृक्षगिरी महाराज यांना संचारबंदीमुळे महामार्गावरून प्रवासाची परवानगी न मिळाल्याने त्यांनी आडमार्गाने प्रवास सुरू केला. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून किडनी चोर फिरत असल्याची अफवा पसरल्याने गडचिंचले गावानजीक ग्रामस्थांनी त्यांना रोखले आणि त्यांच्यावर हल्ला केला. या प्रवाशांची सुटका करण्यासाठी कासा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेले होते. परंतु, संतप्त जमावावर त्यांना नियंत्रण मिळवता आले नाही. या वेळी ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनावरही हल्ला केला. यात या तिघांचा मृत्यू झाला आणि चार पोलिस कर्मचारी जखमी झाले.

 

News English Summary: Three people were killed by a mob at Gadchinchale in Dahanu taluka in Palghar district. Police action has been taken in this regard. Two officers from Casa Police Station have been suspended. The Palghar police superintendent has taken action against the Assistant Police Inspector Anandrao Kale and Deputy Superintendent of Police Sudhir Katare, in charge of the Casa police station.

News English Title: Story Maharashtra state government says strict action taken and arrested all attackers who alleged in Palghar Incident Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या