18 January 2025 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव
x

महाराष्ट्रात कोरोना चाचण्या गुजरातच्या दुप्पट; राजस्थान द्वितीय क्रमांकावर

Covid 19, Corona Crisis< Lab Test

मुंबई, १९ एप्रिल: पीपीई किटसह सर्व सुविधा डॉक्टरांना पुरवल्या जातील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला. पीपीई किट किंवा उपकरणांचा तुटवडा असल्याची सत्यता त्यांनी यावेळी मान्य केली. पण मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनी कोविड व्यतिरिक्त तपासणी करण्यासाठी क्लिनिक सुरु ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील इतर डॉक्टरांनाही त्यांनी असे करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रात आतापर्यंत ६६७९६ टेस्ट झाल्या आहेत. चांगली गोष्ट ही की यातील ९५ टक्के टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टेस्टसाठी लागणारा काळ कमी होऊ शकत नाही. परंतु, गंभीर रुग्णांच्या टेस्ट लवकर करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणतेही लक्षण म्हणजे सर्दी, खोकला, ताप आला तर लपवू नका. लवकर दवाखान्यात या, म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवता येईल, असे आवाहनही त्यांनी केले. सुमारे ६७ हजार टेस्टपैकी ३०६६ रुग्ण आढळून आले आहेत. अनेक जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आल्याचे ते म्हणाले.

केवळ सात राज्यांमध्ये २० हजाराहून अधिक करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आंध्र प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक व तेलंगणात तुलनेत कमी चाचण्या करण्यात आल्या आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये केवळ ६९८६ लोकांच्याच करोना चाचणी करण्यात आली असून लक्षद्वीप येथे केवळ ७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात आज १४,३७८ रुग्ण करोनाबाधित असून एकट्या महाराष्ट्रात ३६४८ रुग्ण करोनाबाधित आहेत. दरम्यान, १८ एप्रिल पर्यंत महाराष्ट्राने देशात सर्वाधिक ५९,१५७ चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानचा क्रमांक असून त्यांनी ४२,७१८ चाचण्या केल्या आहेत तर तिसऱ्या क्रमांकावरील गुजरातने ३०,७३८ चाचण्या केल्या आहेत.

 

News English Summary: Meanwhile, Maharashtra has carried the highest number of 59,157 tests in the country till April 18. Rajasthan is followed by Maharashtra, which has 42,718 tests and Gujarat ranks third with 30,738.

News English Title: Story Maharashtra state is on top corona-tests Covid 19 says ICMR News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x