25 December 2024 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

औरंगाबादचा विकास करुन दाखवा, मी नामांतरासाठी साथ देईन: खा. इम्तियाज जलील

MP Imtiyaz Jalil, CM Uddhav Thackeray, Raj Thackeray

औरंगाबाद: मागील ३ दशकं शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित आहे तसेच विकासाची पूर्ण बोंब असल्याचं पाहायला मिळत. यावरून एमआयएम’ने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले, ” इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा की त्यांना औरंगाबादचं नाव बदलायचं आहे की विकास करायचा आहे? संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्याच्या गोष्टी करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा. तुम्ही कचरामुक्त शहर करुन दाखवा, विकास घडवून दाखवा. तसं केल्यास मी स्वतः तुम्हाला नामांतरासाठी साथ देईन असं खासदार इम्तियाझ जलील म्हणाले.

औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर असे होईल असे मी ३२ वर्षांपासून ऐकतो आहे. निवडणूक जवळ आली की हा मुद्दा उपस्थित केला जातो. आता महानगरपालिकेची निवडणूक येते आहे. त्यामुळेच नामांतराची मागणी केली जाणार हे २०० टक्के माहित होतं. कचरा, आरोग्य, शिक्षण हे शहरातले मुख्य प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी शिवसेना, मनसे प्रयत्न करणार आहेत का? असाही प्रश्न जलील यांनी विचारला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या राजकारणाचा इतिहास पाहता खासदार इम्तियाज जलील यांच्या टीकेचा सर्वाधिक रोख हे शिवसेनेकडे जातो, कारण त्यांची मागील अनेक वर्ष औरंगाबादमध्ये सत्ता असून विकासाचे तीनतेरा झाल्याचं स्थानिक लोकं म्हणतात. दरम्यान मनसेच्या बाबतीत हिंदुत्वासोबत राज ठाकरे नाशिकचं मॉडेल देखील मतदारांसमोर ठेवून मतांचा जोगवा मागू शकतात, मात्र शिवसेनेची विकासाच्या बाबतीत पूर्ण कोंडी झाल्याचं सध्या तरी दिसत आहे. कचरा, स्वच्छता, पाण्याचा प्रश्न आणि इतर अनेक पायाभूत सुविधांवरून मतदार शिवसेनेवर नाराज असल्याचं दिसतं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या मनसेने हिंदुत्वाची कास धरली असली तरी राज ठाकरे हे एक विकासाचं व्हिजन असणारे राजकीय नेते असं आजही राज्यातील लोकांचं मत आहे. औरंगाबादमध्ये ते हिंदुत्वासोबत विकासाला देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतील अशीच शक्यता आहे. कारण हिंदुत्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षासोबत बांधून ठेवेल तर विकासाचा प्रचार मतदाराला मनसेकडे आकर्षित करेल, अशी योजना असावी असं प्राथमिक स्तरावर दिसतं.

मागच्या वेळी जेव्हा राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी ‘औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात’ शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तीशी संवाद साधला होता. त्यावेळी, उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी विकासासोबत औरंगाबाद शहर आणि राजकारणातील वास्तव सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला होता.

उपस्थित संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले होते की, ‘तुम्ही राजकारणाचे बळी ठरला आहात, घाबरून मतदान करता. एकदा डोळे उघडून नीट बघा, कानावरचे हात बाजूला काढा. आधी तुम्ही बदला मग शहर बदलेल. मनसेला संधी द्या, मी स्वच्छ आणि सुरक्षित शहर देतो.” असं आवाहन राज ठाकरे यांनी औरंगाबादवासीयांना दिलं होतं.

त्यावेळी औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकारणातील एक खंत व्यक्त केली होती की, ‘विकास कामांवर मतदान होतं याच्यावरचा माझा विश्वासच उडाला आहे. तुम्ही विकासाला मतदानच करत नाही. केवळ अडचणीच्या वेळीच तुम्हाला राज ठाकरे आठवतो असं सांगताना नाशिक महापालिकेत झाले तसे काम तुमच्या शहरात देखील होऊ शकतात ,”असा विश्वास त्यांनी औरंगाबादवासीयांना दिला होता.

औरंगाबाद शहरातील राजकारणावर बोट ठेवत त्यांनी काही स्थानिक मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनी म्हटलं की, औरंगाबाद शहरात राजकारणी तुम्हाला भीती दाखवतात, निवडणुकीच्या वेळी दंगली घडवल्या की तुम्ही पुन्हा त्यांनाच मतदान करता, मग कशाला हवा तुम्हाला विकास असा घणाघात राज ठाकरेंनी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष एमआयएम’वर केला होता.

 

Web Title: Story MIM MP Imtiyaz Jalil Challenge Raj Thackeray and Uddhav Thackeray over Aurangabad Development issue.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x