23 December 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Sambhajinagar, Aurangabad, Raj Thackeray

औरंगाबाद : आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहे. सध्या राज ठाकरे आणि मनसे पक्षाच्या उभारणीसाठी मैदानात उतरले आहेत. औरंगाबादच्या दौऱ्यावेळी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, मनसे पक्षाबाबत काही पदाधिकारी जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवत आहे. तसेच अशा पदाधिकारांची नावं देखील माझ्याकडे आली असून अशा गद्दारांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला आहे.

‘मी पक्षाच्या बैठकीसाठी आलो आहे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. आपल्याला जोरात काम करायचं आहे. पण काही लोक चुकीच्या बातम्या देतात. आपलेच कार्यकर्ते गद्दार आहेत. त्यांची नावं मला समजली असून मी त्यांना पक्षातून हद्दपार करणार’ असल्याचं राज ठाकरे म्हणाले. ‘गद्दारपणा करणाऱ्यांना पक्षात जागा नाही त्यांची हकालपट्टी मी करणार आहे. 2 दिवसात त्यांना पक्षातून हकालणार आहे’ अशा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना देखील मार्गदर्शन केलं आहे आणि संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक संपूर्ण ताकदीने लढविण्याचा निश्चय केल्याचं संवादात दिसलं.

दरम्यान, काल राज ठाकरे औरंगाबाद दौरा अर्धवट सोडणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. यानंतर जेष्ठ नेते बाळा नांदगावकर याना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. काही माध्यमांनी चुकीच्या आणि अपूर्ण माहितीच्या आधारे चुकीच्या बातम्या दिल्या आहे. राज ठाकरेंच्या सोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकी नियोजित होत्या त्या झालेल्या आहेत. असा खुलासा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुक वर व्हीडीओद्वारे केला आहे.

 

Web Title: MNS Chief Raj Thackeray guidance to party workers over Sambhajinagar Municipal Corporation Election.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x